crime 
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वरला फिरायला गेले अन् होत्याचे नव्हते झाले

सकाळवृत्तसेवा

सातारा : महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या दाम्पत्यांमध्ये वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सिमा अनिल शिंदे (वय 30) हिला धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला व स्वतःने भोसकून घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार 11 वर्षांच्या मुलगा आदित्य अनिल शिंदे (वय 11) याचे समोर घडला. हे दांपत्य धानोरी, विश्रांतवाडी, पुणे येथील असल्याचे समजते. रात्री उशिरा झालेल्या या प्रकाराने हॉटेल मालकाने त्वरीत पोलिसांना व १०८ ला फोन केला, परंतू उशीर झाला होता.

महाबळेश्वर येथिल एका लॉजमध्ये अनिल सुभाष शिंदे (वय ३४) वडार सोसा. ऑफिसजवळ (धानोरी रोड, विश्रांतवाडी पुणे) हे पत्नी सिमा शिंदे सोबत आपल्या दहा वर्षांच्या मुलासोबत महाबळेश्वर येथे पर्यटनास आले होते. सायंकाळी आपल्या रूममध्ये परतले. मात्र, बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लॉजिंग मालकास रूम मधून आवाज आल्याने ते रूमच्या दिशेने गेले. रूम आतून बंद होती लहान मुलाने ही रूम उघडली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोघांचे मृतदेह दिसले.

लॉजच्या मालकाने तात्काळ पोलिस प्रशासन व १०८ रुग्णालयाला फोन करुन दोघानांही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले. मात्र, उपचारांआधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञ व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT