Husbands last appearance from video calling in nipani 
पश्चिम महाराष्ट्र

अन् घेतले व्हिडिओ कॉलिंगवरून पतीचे अंतीम दर्शन... 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मुळचे ताशिलदार गल्लीतील व सध्या मिरज येथे वास्तव्यास असलेल्या भाऊराव धाकलू काळे (वय 87) यांचे शनिवारी (ता.25) निधन झाले. कोरोनामुळे देश बंद असल्याने त्यांच्या अंतयात्रेला पत्नी, मुलगा व मुलगी व नातवंडाना जाता आले नाही. कोरोनामुळे त्यांना व्हिडिओ कॉलिंगद्वारेच अंतिम दर्शन घेता आले. भाऊराव यांची पत्नी  (ता.बेळगाव), मुलगा ताशिलदार गल्ली बेळगाव व मुलगी कोल्हापूरला अडकल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच त्यांना आपल्या कुटुंबीयांची भेट घ्यावी लागणार आहे. 

मिरजेत भाऊराव काळे यांचे निधन

कोरोनामुळे देशभरात मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने वाहतूक सेवा बंद असणार आहेत. तसेच राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे वाहनांनाही प्रवेश बंदी आहे. यामुळे त्यांना मोबाईलवरच अंतीम दर्शन घेता आले. भाऊराव काळे हे रेल्वे विभागात पार्सल अधिकारी म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त 1970 साली मिरज येथील झारीबाग येथे स्थायीक झाले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी, दोन मुलगे व मुलगी तिथेच वास्तव्याला होती. एका मुलग्याला बेळगावात नोकरी मिळाल्याने ते येथेच राहिले. 

पत्नी, मुलगा बेळगावात, तर मुलगी अडकली कोल्हापूरात 

भाऊराव यांचे शनिवारी (ता.25) वृद्धापकाळाने निधन झाले. याची माहिती पत्नी यशोदा काळे, मुलगा अर्जून काळे, मुलगी राजश्री खोत (कोल्हापूर), चेतन खोत (कोल्हापूर) व अर्जून काळे यांच्या पत्नी रेणु काळे, महेश काळे व उमेश काळे यांना देण्यात आली. मात्र, सर्व वाहतूक सेवा बंद असल्याने व नियमांचे पालन करत दुखः असूनही त्यांनी न जाणे पसंत केले. मिरज येथे वास्तव्यास असलेले त्यांचे मुलगे अमृत काळे, शरद काळे व 15 जणांनी अंतीमसंस्कार केले. 


कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे मिरज येथे वास्तव्यास असलेल्या वडिलांच्या अंतयात्रेलाही आम्हाला जाता आले नाही. याचे खुप दुखः आहे. माझ्यासोबत आई मुलग्याला व बहीण कोल्हापूरला अडकली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेणार आहे. व्हिडिओ कॉलिंगवरून अंतीम दर्शन घेतले. 
-अर्जून काळे, मुलगा, ताशिलदार गल्ली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT