Hutatma Sugar Factory election started walwa vote politics esakal
पश्चिम महाराष्ट्र

Walwa : हुतात्मा साखर कारखाना निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू

धामधूम जुलैपर्यंत सुरू राहणार : १५ गावे कार्यक्षेत्र

सकाळ वृत्तसेवा

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रक्रिया आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात संस्था गटातील ठराव देण्याची नोटीस निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर सहसंचालक (कोल्हापूर) यांनी जारी केली. जुलैपर्यंत धामधूम सुरू राहील.

कारखान्याचे आठ हजार सभासद आहेत. जवळपास दीड हजार मतदार हयात नाहीत. कार्यक्षेत्र पंधरा गावे आहेत. वाळवा व पलूस तालुक्यातील गावे कार्यक्षेत्रात येतात. सात वाड्या व आठ गावे आहेत. अध्यक्ष वैभव नायकवडी यांची एकहाती सत्ता आहे. स्थापनेपासून संस्थापक गटाची सत्ता आहे. संस्थापक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी वंचित, पददलित जनतेला प्रतिनिधित्व देऊन कामकाज केले. त्या काळात हुतात्मा राज्य व राष्ट्रीय पातळीवर आदर्श कारखाना म्हणून ओळखला जात अले.

अण्णांच्या नंतर सभासदांनी या कारखान्याची सूत्रे नायकवडी यांच्याकडे दिली. त्यांची तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली. सुरुवातीला त्यांनी चांगली कामगिरी नोंदवली. एकहाती सत्ता असूनही त्यांना गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. निवडणुकीत विरोधी गट सातत्याने नशिब आजमावत आहे. वीस वर्षांत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यावेळच्या निवडणुकीतही विरोधी गट ताकदीने उतरण्याची तयारी करीत आहे. निवडणुकीचे मैदान दोन महिन्यांवर आहे. तोपर्यंत विरोधी गटाने कार्यक्षेत्रात संपर्क वाढवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT