Hygiene awareness raising elephants in Vita city 
पश्चिम महाराष्ट्र

विटा शहरात हत्ती करतोय स्वच्छता जनजागृती 

गजानन बाबर

विटा : येथील गणेश हत्ती सजून, डोलात जात विटेकर नागरिकांना स्वच्छतेबाबत प्रबोधन करीत, जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सहभागी झाला आहे. लहान मुलांसह सर्व स्तरातील लोकांना हत्तीबद्दल असलेले आकर्षण लक्षात घेऊन विटा नगरपालिका व भैरवनाथ यात्रा समितीने गणेश हत्तीला परिधान केले जाणारे झूल पद्धतीचे वस्त्र नवे तयार केले आहे. त्या वस्त्रावर माझी वसुंधरा आणि स्वच्छता अभियानचा संदेश देणारे डिझाईन बनवले आहे. 

विटे शहरातील भैरवनाथ अष्टमी यात्रा समितीच्या वतीने काही वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष स्व. हणमंतराव पाटील साहेब यांनी मोहन हत्ती आणला. त्याचे आजारामुळे निधन झाल्यानंतर यात्रा समितीचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील व सहकारी यांनी गणेश हत्ती आणला. 

गेल्या काही वर्षांत संयमी व प्रेमळ हत्ती म्हणून तो सर्वपरिचित झाला. लहान मुले, महिलाही त्याला जवळ जाऊन खाऊ घालतात. पण कधी गणेशने कुणाला धक्का लावला नाही. त्यामुळे तो विटेकरांचा लाडका बनला. त्याला स्वच्छता अभियानात अभिनव पद्धतीने सहभागी करून घेण्याचे काम विटा शहराचे स्वच्छता अभियानचे ब्रॅंड अँबेसिडर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाले. कोणतीही सुविधा नसताना ऍड.वैभव पाटील व त्यांचे सहकारी आणि यात्रा समितीच्या नियोजनाने मोठ्या मेहनतीने व जिद्दीने गणेशचा सांभाळ होत आहे. पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अव्वल कामगिरी करून पंचतारांकीत मानांकन विटे नगरीला प्राप्त करून घ्यायचे आहे. असा संदेश गणेश हत्ती देत आहे, अशी भावना सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT