पश्चिम महाराष्ट्र

गेल्या 35 वर्षांत नेत्यांना मी शिस्त लावू शकलो नाही : ढोबळे

सकाळवृत्तसेवा

मोहोळ : मोहोळच्या राजकारणाला व नेत्यांना मी गेल्या 35 वर्षांत शिस्त लाऊ शकलो नाही. ते काम आमदार रमेश कदम यांनी केवळ पाच महिन्यांत केले. तो असल्याशिवाय पुन्हा तालुक्याला शिस्त लागणार नाही. रोडच्या पलीकडचे सगळंच ओरबडून घेतले. त्यात माझा काय दोष नव्हता. मात्र, प्रकाश चवरे नावाच्या कारखान्यातील हंगामी कामगाराने मला प्रपंच करा, असे सांगितले .मात्र, ते सोलापुरवाशी झाल्याने त्यांनी आपले पेनुरातील घर आहे का, पडले ते आधी पाहावे. मगच दुसऱ्याला ज्ञान शिकवावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील नव्याने निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्याचा सत्कार सोहळ्याचे त्यावेळी ढोबळे बोलत होते. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, जि. प. सदस्य तानाजी खताळ, समता गावडे, संतोष वाकसे, यशवंत नरुटे, सुरेश शिवपुजे, रामचंद्र खांडेकर, मोहन होनमाने, अज्ञान होनमाने, सरपंच श्रीदेवी हांडे, उपसरपंच त्रिंबक जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा समाचार घेताना ढोबळे पुढे म्हणाले, बांधलेली पेंडी विस्कटायची व राजकारण करावयाचे असा तालुक्यातील नेत्यांचा धंदा आहे. तो हाणून पाडा, फक्त पेंडी विस्कटू देऊ नका. बैलसुद्धा काकरी धरून चालतो. मात्र, तालुक्याचे राजकारण काकरी सोडून चालले आहे. ते पाहा व बंद करा. दोन्ही निवडणुकात उमेदवार होण्यापेक्षा माणस निवडून आणण्याचे काम मला करावयाचे आहे. कामाचा बैल आणावयाचा त्याच्याकडून काम करून द्यावयाचे व त्याला साेडून द्यावयाचे अशी कामाची स्टाईल आहे. कोणावरही उपकार नाहीत, दुधावरची साय, दही, तूप अगोदरच काढून घेतले आहे. उपकार असतील तर फक्त ताकाचेच असले पाप नेत्यांनी केले.

सभापती डोंगरे म्हणाले, भविष्यात विकासाच्या अनुषंगाने गोटेवाडीकडे चांगले लक्ष राहील. जि. प. सदस्य तानाजी खताळ यांनी या भागाचा चांगला विकास केला झाले. शाळा खोल्या व ग्रामपंचायत इमारत हे मुख्य दोन प्रश्न या गावांचे आहेत. ते प्राधान्याने सोडवू, पूर्वी नेत्यांचे फोटो टाकून कार्यकर्त्यांना जाहिराती द्याव्या लागायच्या. मात्र, आता कार्यकत्त्याचे फोटो टाकून नेत्यावर जाहिराती देण्याची वाईट वेळ आली आहे. यावेळी मोहोन होनमाने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flights: IndiGo संकटात? 200 फ्लाइट्स रद्द, शेअर्स कोसळले… पण सुप्रीम कोर्टात आज नक्की काय घडणार?

farming Success Story:'निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी घेतले डाळिंबाचे उत्पादन'; किलोला दोनशे रुपये दर; माण तालुक्यात क्षेत्र वाढले..

Beed Railway: बीड, आहिल्यानगर रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना दिलासा

Voter List Error Nashik Incident : मतदार यादीतील गोंधळाचा उत्तम नमुना आला समोर! ; नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांना चक्क मृत दाखवले !

शंभुराजने प्राजक्ताला उचलून घेतलं आणि... लग्नानंतरचा जेजुरीतला नवदाम्पत्याचा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT