dudi 
पश्चिम महाराष्ट्र

"झूम ऍप'व्दारे मतदान घेणारे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, "मीच मोजले, मीच टीक केली' 

अजित झळके

सांगली ः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज सर्वार्थाने वेगळी आहे. या महापालिकेत भाजपची सरळ सत्ता असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सत्तापालट करून दाखवला. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आणि झूम ऍपव्दारे झाले. कोरोना संकटामुळे घराघरांत पोहचलेल्या "झूम'वर मतदान घेण्यात आले आणि त्याची निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यावर. ते म्हणाले, ""मला मतदान प्रक्रियेचा आता बऱ्यापैकी अनुभव आला आहे. इथेही मी कुणावर अवलंबून राहिलो नाही. वर केलेले हातही मीच मोजले आणि टीकही मीच केली. त्यामुळे कुणी शंका घ्यायचे कारणच उरले नाही.'' 


जितेंद्र डुडी हे मूळचे हरियाणाचे. ते आयएएस अधिकारी आहेत. ते आधी झारखंड केडरला होते. लग्नानंतर त्यांना सोयीचे म्हणून महाराष्ट्र केडर देण्यात आले. आथा ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी याआधी झारखंडच्या दुर्गम भागात निवडणूकीचे कामकाज केले होते, जेथे इंटरनेटची अजिबात सुविधा नव्हती. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रक्रियेचा अनुभव घेतला. सांगलीत पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापालिका सभापती निवडीचा कार्यक्रम ऑनलाईन मतदानाने पार पाडला होता. त्यामुळे ऑनलाईन मतदान हे त्यांच्यासाठी आव्हान नव्हते, मात्र ही निवडणूक खूप तणावाची असल्याने त्याबाबत उत्सुकता होता. 


श्री. डुडी म्हणाले, ""हा सगळा तंत्राचा खेळ होता. त्याबाबत कर्मचारी प्रशिक्षित होते. नगरसेवकांनाही त्याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली होती. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येण्याचे कारण नव्हते. एकाने शंका घेतली, त्याचे योग्य निरसन केले. कुणालाही घाई करू दिली नाही. मतदान मी स्वतः मोजले, त्याच्या टीक मीच केल्या.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT