पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजीला दानोळीतूनच पाणी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - इचलकरंजीसाठी दानोळी गावातूनच पाण्याची अमृत योजना राबवावी, यासाठी दोन दिवसांत ई निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत आज दुुपारी शासकीय विश्रामधाम येथे बैठक झाली.

इचलकरंजी तसेच लगतच्या परिसराची लोकसंख्या चार लाखांवर पोचली आहे. लोक पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. आठवड्यातून एकदा पाणी मिळते. दिवसेंदिवस हा प्रश्‍न अधिक गंभीर बनता चालला आहे. त्यामुळे वारणा नदीतून पाणी उचलून योजनेद्वारे इचलकरंजीला पाणी द्यावे अशी मागणी उपस्थितांनी केली. पालकमंत्र्यांनी योजनेची माहिती घेतली ज्या दानोळी गावातून योजना मंजूर झाली त्याच गावातून ती राबवावी तसेच दोन दिवसांत ई निविदा प्रसिद्ध करावी असे निर्देश दिले.

वारणा योजना अशी..

  •  प्रस्तावित खर्च ७० कोटी रु.
  •  उद्‌भव केंद्र दानोळी 
  •  सुमारे २० किलोमीटर लांबी 
  •  रोजची क्षमता ८९ एमएलडी 
  •  २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून आराखडा
  •  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन

इचलकरंजीसाठी वारणा नदीतून नेण्यासाठी सुमारे ७० कोटी खर्चाची अमृत योजना मंजूर झाली. दानोळीसह नदीकाठच्या सर्व गावांनी योजनेस विरोध केला. त्याचे पडसाद दानोळीसह लगतच्या गावात उमटले. मुख्यमंत्र्यांपर्यंत योजनेसंबंधी बैठक झाली. विरोधामुळे कोथळी येथे सर्व्हेला सुरवात झाली. तेथेही विरोध झाल्याने आठ महिने काम लोंबकळत पडले आहे.

इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्‍न मिटायचा असेल तर वारणेतून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. उपस्थितांचे म्हणणे ऐकून पालकमंत्र्यांनी ज्या मूळ गावातून योजना मंजूर आहे तेथून काम सुरू होण्यासाठी ई निविदा काढण्याचे आदेश दिले. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी आमदार अशोक जांभळे, आरोग्य समिती सभापती संगीता आलासे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT