इचलकरंजी (कोल्हापूर) : पाच लोटकी आणि त्यावर एक झाकण... वर्षानुवर्षे परंपरा असलेली मकर संक्रांतीचा सण आजही याच पध्दतीने साजरा केला जातो. या सणासाठी लागणारी तब्बल 11 हजार लोटकी येथील जनार्दन कुंभार हे एकटेच करतात. सणाची परंपरा थोडीशी कालबाह्य होत असली तरी अनेक नागरिक आजही याच श्रध्देने हा सण साजरा करतात.
मकर संक्रांतीचा सण शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संक्रांतीच्या पूर्वीच 7 ते 8 दिवस त्यासाठी लागणारे लोटकी बाजारात येतात. एका पूजेवेळी 5 लोटकी आणि त्यातील एकावर झाकण ठेवण्याची पध्दत परंपरागत आहे. याच परंपरेप्रमाणे नागरिकही अशा लोटक्यांची खरेदी करतात. शहर आणि परिसरात लोटकी तयार करणाऱ्यांची संख्या कमी होत गेली मात्र जनार्दन कुंभार यांनी गेली वीस वर्षे ही परंपरा कायम ठेवली आहे.
11 हजारहून अधिक लोटक्यांची मागणी
यावर्षाच्या सणासाठी त्यांना तब्बल 11 हजारहून अधिक लोटक्यांची मागणी आली आहे. त्यासाठी गेले महिनाभर ते यावर काम करतात. परंपरेने कुंभार व्यवसायाची आवड असली तरी पदवीधर झाल्याने एखादी नोकरी मिळते का या उद्देशाने ते कसबा बीड या गावातून शहरात आले. मात्र त्यावेळी एकूणच व्यवसायाची स्थिती आणि कुटुंब चालेल एवढ्या पगाराची नोकरी त्यांना मिळालीच नाही. म्हणून त्यांनी आपल्याकडे असलेल्या अवगत कलेचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
20 वर्षे अखंडपणे कामात सात्यत
शिक्षण घेत असतानाच त्यांनी वडिलांच्या हाताखाली कुंभार कामाचे प्रशिक्षण घेतले होते. हीच कला त्यांनी जोपासत गेली 20 वर्षे अखंडपणे संक्रांतीसाठी लागणाऱ्या छोट्या लोटक्या बनविण्याचे काम करत आहेत. शहरातील विविध विक्रेते त्यांच्याकडे दोन महिन्यापूर्वीच मागणी नोंदवितात. जवळपास 70 टक्के उत्पादन त्यांनी आतापर्यंत पूर्ण केले आहे. बाजारामध्ये सर्वसाधारणपणे 20 ते 25 रूपयास लोटके आणि झाकण मिळते. आजही तेवढ्याच श्रध्देने साजरा होत असलेल्या या सणासाठी परंपरेप्रमाणे लोटक्याची खरेदी अनेकजण करत असतात.
लोटके करणाऱ्यांची संख्या खूप कमी
या व्यवसायात भांडवलापेक्षा कलेला महत्व आहे. कलेनुसारच उत्पादन तयार होते. मातीत काम करण्याची अनेकांची इच्छा नाही त्यामुळेच असे लोटके करणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. वास्तविक ही कला टिकण्याची गरज आहे.
जनार्दन कुंभार
घोड्याची लीद ते भुस्सा
पूर्वी मटकी तयार करण्यासाठी घोड्याची लीद वापरली जात असे. यामुळे मटकी कठीण व त्यात पाझरपणा येतो. आता या ऐवजी लाकडी भुशाचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी वर्षभरही विविध आकाराच्या लोटक्यांना मागणी असते. विशेषत: हॉटेलिंग व्यवसायात आता अशा लोटक्यांना मागणी वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.