shiv bhojan.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

मागणी केल्यास "शिवभोजन' आता पॅकेटमध्ये घरपोहच

सकाळवृत्तसेवा

सांगली ः "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेरगावचे विद्यार्थी, परप्रांतीय कामगारासाठी शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात सध्या 14 केंद्र सुरु असून या ठिकाणाहून पॅकेटस्‌ मागणीप्रमाणे जागेवर देण्याची व्यवस्था केलेली आहे. योजनेची गरज आणि मागणीप्रमाणे आणखी व्याप्ती वाढवली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. आठ दहा जणांनी एकत्रित मागणी केल्यास ते जागेवर द्यायचीही व्यवस्था केली जाईल.


जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,"" लोकांच्या मागणीप्रमाणे या केंद्रातून मागितलेल्या ठिकाणी पॅकेटच्या पार्सलची सोय करण्यात येतील. त्यासाठी आगावू मागणी मात्र करावी लागेल. गरीबांना केवळ 5 रुपयात सकाळी 11 ते दुपारी तीन या काळात सोय उपलब्ध असेल.
पुरवठा अधिकारी बारवे म्हणाल्या, सांगली, मिरज शहरासह प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी

सुरू केलेल्या केंद्रांची संख्या 14 आहे. सांगली, मिरज शहरासाठी 900 आणि तालुक्‍याच्या ठिकाणी 1350 अशी 2250 थाळा वाटप सुरू आहे. सांगली, मिरज शहरात पाच ठिकाणी योजनेचे केंद्रे सुरू होती. त्यात कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस, जत, वाळवा व शिराळा या तालुक्‍यांचा समावेश आहे. येथील प्रत्येक केंद्रावर दीडशे थाळ्यांची सोय करण्यात आलेली आहे. गरजेनुसार केंद्रे वाढवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT