If Maharashtra Kesari happens Elephant procession, Maharashtra Kesari News sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘महाराष्ट्र केसरी’ झाल्यास हत्तीवरून मिरवणूक

संग्राम कांबळे आणणार कर्नाटकातून हत्ती; साताऱ्यात सुरू आहे स्पर्धा

शामराव गावडे

नवेखेड : कोल्हापूरमधील गंगावेश तालमीचा कोणताही पैलवान ‘महाराष्ट्र केसरी’ झाला तर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असा संकल्प कुस्ती मल्लविद्याचे प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ५० हजार रुपये देऊन त्यांनी कर्नाटकमध्ये हत्ती बुकही केला आहे. (Maharashtra Kesari News Updates)

सातारा येथे सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. माती व गादी गटातील पैलवान दोन दोन फेऱ्या जिंकून अंतिम लढतीकडे वाटचाल करीत आहेत. महाराष्ट्र केसरीची गदा मिळविण्यासाठी सर्वच मल्ल जीवाचे रान करीत आहे. कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापूरमधील श्री शाहू विजयी गंगावेश तालमीला मोठी परंपरा आहे. याच तालमीने महाराष्ट्राला आठ ते नऊ महाराष्ट्र केसरी मल्ल दिले आहेत. यामध्ये पहिले महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, पैलवान दीनानाथ सिंह टोपन्नागोजगे, रुस्तम-ए-हिंद हरीचंद्र बिराजदार, संभाजी आसगावकर, पैलवान अप्पासाहेब कदम यांचा समावेश आहे.

शाहू विजयी गंगावेश तालमीला कित्येक महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळाल्या आहेत. पहिले डबल महाराष्ट्र केसरी पै. गणपतराव खेडकर हे सुद्धा गंगावेश तालमीचेच मल्ल व त्यानंतर सुद्धा कित्येकांनी गंगावेश तालमीला गदा मिळवून दिल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून गंगावेश तालीम मैदानी कुस्तीत क्रमांक एकची असूनही महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचलेली नाही.आजमितीला तालमीत महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे, सिकंदर शेख, प्रकाश बनकर, भैरू माने, दत्ता नरळे या सारखे राष्ट्रीय मल्ल येथे सराव करतात.

इतर अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात. यापैकी कोणीही जर महाराष्ट्र केसरी ‘किताब’ जिंकला तर कोल्हापूरच्या आजवरच्या परंपरेप्रमाणे त्यांची हत्तीवरून विजयी मिरवणूक कोल्हापूर शहरातून जल्लोषात काढली जाणार आहे.

कोल्हापूरचा नाद खुळा.

‘जगात भारी कोल्हापुरी’ असं म्हणलं जात. कारण कोल्हापूरचा नाद खुळा एकदा ठरलं की ठरलं. कारण, यापूर्वी महाबली सतपालला जो चितपट करेल त्या मल्लाची कोल्हापूरमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असे कोल्हापूरच्या जनतेने जाहीर केले आणि १९७७ ला पैलवान हरिचंद्र बिराजदार यांनी सतपालला चितपट केले. त्यानंतर कोल्हापुरी जनतेतने पैलवान बिराजदार व वस्ताद गणपतराव खेडकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती.

स्वप्न अपुरे

२०१८ मध्ये पैलवान संग्राम कांबळे यांनी कर्नाटकातून कोल्हापुरातील तावडे हॉटेल येथे हत्ती आणून ठेवला होता. पण सेमीफायनलला माऊली जमदाडे थोडक्यात पराभूत झाल्यामुळे ते स्वप्न अपुरे राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT