zp sangli 
पश्चिम महाराष्ट्र

गरज असेल तरच झेडपीत या

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा अधिकच सावध झाली आहे. सर्वसामान्य लोकांनी त्यांचा खूप महत्त्वाचे काम असेल, अपरिहार्यता असेल तरच जिल्हा परिषदेकडे यावे. अन्यथा, त्यांच्या तक्रारी किंवा कामे ऑनलाईन आणि मोबाईलच्या माध्यमातून कळवाव्यात. तशी सोय केली जाईल, अशी भूमिका घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे धोरण एक-दोन दिवसांत जाहीर केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

देशभरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अतिदक्षता घेतली जात आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सरकारी कर्मचारीही काहीसे अस्वस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली जात आहे. त्यामुळे काहीएक प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षणासाठी निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबत श्री. राऊत यांनी एक आराखडा हाती घेतला असून तो लवकरच अमलात येणार आहे.


जिल्हा परिषदेत दररोज काही शे लोकांची ये-जा असते. काही लोक तासन्‌तास बसून असतात. टेबल फिरत राहतात. जिल्ह्याच्या सर्व भागातून लोक येतात. त्यांनी आता गरज असेल तरच इकडे यावे. त्यांची कामे थांबणार नाहीत. त्यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली जाईल, असे श्री. राऊत यांनी सांगितले. ई-मेलद्वारे काम सांगता येईल किंवा मोबाईलवर संपर्क करून काम मार्गी लावता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT