If you come to Mumbai, Punekar village, you will have to stay here 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबई, पुणेकर गावात आल्यास इथे करावा लागणार मुक्काम

सकाळवृत्तसेवा

सांगली ः परराज्यातील लोकांसह पुणे, मुंबई आणि अन्य राज्यात अडकून पडलेल्या लोकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे हे लोक आता आपापल्या गावी येणार आहेत. त्यातील पुणे आणि मुंबईसारख्या हॉट स्पॉट शहरांतून आलेले "गावकरी' गावातील शाळा किंवा मंगल कार्यालयात ठेवण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. अन्य शहरातून आलेल्यांना "होम क्वारंटाईन' केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली.

येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन बाबत पुढील निर्णय होणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय परराज्यातील कामगारांचे काय? पुणे, मुंबईसह देशभर अडकून पडलेल्या लोकांचे काय? असे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. या टप्प्यात या लोकांना आपापल्या गावी जाण्याची मुभा दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील काही हजार लोक सांगलीत येतील. जिल्ह्यात त्यांच्या त्यांच्या गावी जाण्याची सोय केली जाणार आहे. त्याआधी जिल्ह्याच्या हद्दीवर त्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल. होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. गावात जाताच त्यांनी ग्रामपंचायतीला माहिती द्यायची आहे. त्यानंतर पुढील चौदा दिवस ते घरातच थांबतील, असे श्री. राऊत यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले,""या काळात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने नियमांचा भंग केला तर त्यांनी तत्काळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी गावातील शाळा आणि मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत. शिवाय, मुंबई, पुण्यासारख्या हॉट स्पॉटमधून आलेल्या लोकांची सोय कुठे करावी, याबाबत निर्णय होईल. बहुदा, या लोकांची सोय संस्था क्वारंटाईन म्हणून केली जाऊ शकते. अर्थात, ग्रामीण भागात तरी त्यांना घरचे जेवण, घरातून अंथरून, पांघरून दिले जाईल, असे नियोजन आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT