flour.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रवा पाहिजे तर मैद्याच्या पोत्याची सक्ती : होलसेल विक्रेत्यांचा फंडा

सकाळवृत्तसेवा

सांगली-"लॉकडाऊन' मुळे जिल्ह्यात जीवनावश्‍यक वस्तूंचे दर काही प्रमाणात वाढत असून काहीचा तुटवडा जाणवतोय. रवा काही दिवस मिळत नव्हता. परंतू त्याचा पुरवठा होऊ लागलाय. परंतू त्यासाठी होलसेल विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना वेगळीच अट घातली आहे. "रव्याचे पोते पाहिजे असेल तर मैदा पोते देखील घेतले पाहिजे' असा आग्रह करून मैदा गळ्यात मारला जातोय. मोठ्या दुकानदारांची कोणतीच अडचण नाही. परंतू किरकोळ विक्री असणाऱ्या दुकानदारांसमोर मैदा खपवायचा कसा? हा नवा वांदा निर्माण झाला आहे. 


कोरोनामुळे "लॉकडाऊन' केल्यानंतर हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद झाला आहे. बेकरी देखील ठराविक सुरू आहेत. खानावळी, खाद्यपदार्थाचे गाडे, टपऱ्या देखील पूर्ण बंद आहेत. पाव, बिस्कीट, केक आणि हॉटेलमध्ये पुऱ्यासाठी मैदा वापरला जातो. परंतू "लॉकडाऊन' मुळे मैदा विक्रीच ठप्प आहे. होलसेल दुकानदारांकडे मैद्याच्या पोत्यांची थप्पी आहे. तसेच रवा-मैदा बनवणाऱ्या फॅक्‍टरीमध्ये देखील मैद्याची पोती पडून आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात रवा-मैदा बनवणाऱ्या फॅक्‍टरी बंदच होत्या. तसेच गहू टंचाई देखील काहीकाळ होती. 


लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नाष्ट्यासाठी रवा खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे काही दिवस तुटवडा जाणवला. त्यानंतर सध्या रवा पुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. परंतू तो देताना मैदा घेण्याची अट घातली जात आहे. उत्पादकांनी होलसेल विक्रेत्यांना रवा पाहिजे असेल तर मैदा देखील घेतला पाहिजे अशी अट घातली आहे. तोच कित्ता होलसेल विक्रेत्यांनी गिरवला आहे. दुकानदारांना रवा पोते पाहिजे असेल तर सोबत मैदा पोते देखील घेण्याचा आग्रह केला जात आहे. किंबहुना मैद्याचे पोतेच गळ्यात मारले जात आहे. ज्या दुकानदारांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे, ते रवा आणि मैदा घेत आहेत. परंतू इतरांना हा सौदा पसंत नाही. तरीही नाईलाज आणि ग्राहकांची रव्याची मागणी लक्षात घेऊन ते खरेदी करत आहेत. परंतू त्यांच्यापुढे मैदा खपवण्याचे आव्हान आहे. 

रव्यापेक्षा मैदा अधिक- 
गव्हापासून रवा बनवला जातो. परंतू गव्हापासून रवा करताना 40 टक्के रवा आणि 60 टक्के मैदा तयार होत असतो. सध्या हॉटेल, बेकरी मधून मागणी नसल्यामुळे उत्पादक आणि होलसेल विक्रेते मैदा घेण्याची सक्ती करत आहेत. नुकसान टाळले जावे यासाठीच हा फंडा काढला आहे. 
 

बिस्कीटसाठी चॉकलेटची सक्ती- 
बिस्कीटाला मागणी अधिक आहे. तर शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे आणि लहान मुलांना घराबाहेर सोडले जात नसल्यामुळे चॉकलेट-गोळ्या खपत नाहीत. तसेच पान टपऱ्याही बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून चॉकलेट-गोळ्यांचा साठा पडून आहे. त्यामुळे बिस्किट पाहिजे असेल तर चॉकलेट-गोळ्यांचे डबे घ्या म्हणूनही सक्ती केली जातेय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT