Illegal construction will not be tolerated worn Minister for Urban Development eknath shinde 
पश्चिम महाराष्ट्र

बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना एकनाथ शिंदेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

सांगली :  जिल्ह्यातील महापालिकेसह नगरपालिकांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्य सरकारने गुंठेवारी नियमितीकरण आणि वाढीव एफएसआयमुळे राज्यातील घरांच्या किंमती कमी येतील. यापुढील काळात गुंठेवारी वाढणार नाही याची जबाबदारी सबंधित स्थानिक स्वराज्य यंत्रणेची असेल. यापुढे बेकायदा बांधकाम खपवून घेणार नाही, असा इशारा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला.


सांगली, मिरज, कुवपाड महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा, विविध प्रश्‍न, प्रलंबीत मागण्यांबाबत मंत्री  शिंदे यांची आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितिन करीर उपस्थित होते.

 शिंदे म्हणाले," राज्यात बांधकामांबाबत एकच सुस्पष्ट नियमामुळे विकास नियमावली कायदा आणि गुंठेवारी नियमितीकरणामुळे सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळतील. महापालिकांनी शहराच्या विकासासाठी आता निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे ठाणे आणि अन्य शहराच्या धर्तीवर पर्याय शोधले पाहिजेत. यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सबंधित संस्थेची राहिल.

हेही वाचा- पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील 22 हजार जणांना लस -
 '
मंत्री  शिंदे म्हणाले,
-गरपालिकांना त्रांतिक अधिकारी डेप्युटेशनवर देणार
-आटपाडी नगरपालिकेसाठी सुधारित प्रस्ताव पाठवा
-साहित्यिक ग. दि. माडगूळकराच्या नाट्यगह जागेसाठी सकारात्मक निर्णय

निधी खर्चाचे नियोजन, अंमलबजावणी, गुणवत्ता व वेळेचे बंधन पाळा

सर्वच नगरपालिकांच्या विकासासाठी निधी देणार

भंडाऱ्यांच्या घटनेची पुनरावृत्ती नको...मंत्री शिंदे
मंत्री . शिंदे म्हणाले,भंडारा येथील दहा बालकांची घटना निषेधार्ह आहे. या घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यापुढे अशी घटना घडणार नाही याची सबंधित विभागावर जबाबदारी राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: आकाश दीपसमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले, टॉम ब्लंडल शतकासाठी उभा; नाट्यमय घडामोडींचं पहिले सत्र

श्रेयस अय्यर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० संघात खेळणार; हा सामना केव्हा, कुठे व कोणाविरुद्ध होणार?

Vaibhav Sooryavanshi Next Match : आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपलं, आता वैभव सूर्यवंशी कधी व कुठे खेळताना दिसणार? जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

Pune Crime : गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; कोयता गँग, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवार यांचे पोलिसांना निर्देश

Prithviraj Chavan : मतदारसंघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांचे जागावाटप बदलू नका; खासदारसंख्या वाढवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT