Inauguration of Fatehsingrao Naik Memorial today by Sharad Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

फत्तेसिंगराव नाईक स्मृतीस्थळाचे आज शरद पवांराच्या हस्ते उद्‌घाटन

शिवाजी चौगुले

शिराळा (जि. सांगली) : लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते उद्या (ता. 22) होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

यावेळी नाईक म्हणाले, शुक्रवारी (ता. 22) स्व. फत्तेसिंगअप्पा व आई स्व. लीलावती नाईक यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने शिराळा विधानसभा मतदार संघ व शाहूवाडी तालुक्‍याच्या विकासासाठी भगिरथ प्रयत्न करणाऱ्या अप्पांच्या स्मृति चिरंतन जतन व्हाव्या म्हणून कारखाना कार्यस्थळावर त्याचे स्मृतीस्थळ व पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

स्व. अप्पांचे संपुर्ण जीवन संघर्षात गेले. त्यांचे जीवन सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. त्यांनी शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रासह कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळापर्यंत राबणाऱ्या हातासाठी केलेल्या कामाची हे स्फूर्तिस्थळ आपणास चिरंतन प्रेरणा देत राहील. 

यावेळी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख प्रमुख उपस्थित असणार आहेत. 

हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता कारखाना कार्यस्थळावर चिखली येथे होईल. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील असलेल्या शिराळा, शाहुवाडी तसेच वाळवा तालुक्‍यातील लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

संपादन :  युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

World Sparrow Day : ३०० वर्षांची परंपरा! बिजनौरच्या हवेलीत चिमण्यांचे ‘राजघराणे’; जागतिक चिमणी दिनी बर्थडे सेलिब्रेशन

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

Chhatrapati Sambhajinagar: गर्भलिंगनिदान प्रकरणात पोलिसांची कारवाई; विदेशी प्रोब मशीन जप्त

SCROLL FOR NEXT