inauguration of reliance cancer hospital in Solapur  
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरात रिलायन्स कॅन्सर हॅास्पिटलचे उद्धाटन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रिलायन्स कॅन्सर हॅास्पिटलमुळे सोलापुरात अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे, असे खासदार डॅा. जयसिद्धेश्वर
महास्वामी यांनी सांगितले. 

अक्कलकोट रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या हॅास्पिटलचे उदघाटन डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी, कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संतोष शेट्टी, रिलायन्स हॅास्पिटल्सच्या रेडिएशन अॅान्कालॅाजी विभागाचे राष्ट्रीय प्रमुख डॅा. कौस्तुभ तालपात्रा व मोहन डांगरे व्यासपीठावर होते. मुंबईतील पावसामुळे उदघाटक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि हॅास्पिटलच्या अध्यक्षा टिना अंबानी कार्यक्रमास येऊ शकल्या नाहीत.

डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे कॅन्सरवर तातडीने उपचार होण्यासाठीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. या हॅास्पिटलसाठी टिना अंबानी यांनी सोलापूरची निवड केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. देशात कॅन्सरवरील सर्वसमावेशक उपचाराची केंद्र फार कमी आहेत, त्यात रिलायन्स हॅास्पिटलची भर पडली आहे.

शेट्टी म्हणाले, देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशात मृत्यूचे कारण हे कर्करोग असण्याचे कारण वाढत चालले आहे. गेल्या 26 वर्षांत हे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही कॅन्सर उपचार केंद्रे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या पॅनलवर असून या योजनेच्या लाभार्थ्यांनाही या ठिकाणी उपचाराचा लाभ घेता येणार आहे. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT