Increase in buses from ten depots in the district 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यातून दहा आगारातून भाडेवाढ न करता बस फेऱ्यात वाढ 

घनश्‍याम नवाथे

सांगली : कोरोनाच्या आपत्तीमध्ये तोट्यात आलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवत वाहतूक सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील दहा आगारातून लांबपल्ल्याच्या आणखी काही सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी दिली. 

लॉकडाउन काळात जिल्ह्यात अडकलेल्या प्रवाशांना राज्यातील विविध भागात तसेच राज्याबाहेरही सुखरूप सोडण्याची कामगिरी सांगली विभागाने बजावली होती. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्यानंतर जिल्हांतर्गत तसेच नंतर आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर माल वाहतूक देखील सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील दहा आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक फेरीनंतर गाडी निर्जंतुकीकरण करून वापरली जाते. "नो मास्क- नो सवारी' हे अभियान देखील राबवले जात आहे. 

लॉकडाउन काळात निम्म्या क्षमतेने तसेच सध्या पूर्ण क्षमतेने बसेस धावत आहेत. त्यासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. प्रवाशांनी राज्य महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही विभाग नियंत्रक ताम्हनकर यांनी केले. 

आगारनिहाय वाढवलेल्या फेऱ्या व कंसात गाडी सुटण्याची वेळ : सांगली आगार- औरंगाबाद (6.15 वाजता), नाशिक (8.45), (16.45), स्वारगेट (शिवशाही 10.30), चिंचवड (शिवशाही 15.30), विश्रामबाग ते स्वारगेट (शिवशाही 22.45). मिरज आगार- ठाणे (9.15), जमखंडी पुणे (जमखंडीहून 9.30), स्वारगेट (शिवशाही 22.15). इस्लामपूर आगार- मुंबई सेंट्रल (10.00), स्वारगेट (6.00), नाशिक (11.00), बारामती (7.15). तासगाव आगार- पणजी (7.45), औरंगाबाद (9.20), बारामती (9.00), स्वारगेट (13.00), नाशिक (15.00). विटा आगार- मुंबई (8.30), पुणे (5.45), (12.00), चिंचवड (15.15). जत आगार- परेल (8.00), उमरगा (13.30), मुंबई (19.15). आटपाडी आगार- मुंबई (7.30), मुंबई (18.00). कवठेमहांकाळ आगार- चिंचवड (10.00), नांदेड (8.00), परेल (7.00), स्वारगेट (12.40). शिराळा आगार- अक्कलकोट (8.00), परळी वैजनाथ (8.45). पलूस आगार- औरंगाबाद (7.30), पिंपरी चिंचवड (14.00). 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT