Increase in Krishna water level 
पश्चिम महाराष्ट्र

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ... का...?

सकाळवृत्तसेवा

सांगली : चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीची आयर्विन पुलानजीक पाणीपातळी खालावत सहा फुटांवर गेली होती. त्यामुळे गढूळ पाणी पुरवठा होऊ लागला होता. पण आता कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे शुक्रवारपासून पाणी पातळीत वाढ झाली असून शनिवारी दुपारी दहा फुटांवर पाणी पातळी झाली आहे.

चार दिवसांपासून आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी किमान साडेचार फुटांवर होती. चार महिन्यांपूर्वी म्हणजे आठ व नऊ ऑगस्टरोजी कृष्णेच्या महापुराने आयर्विनच्या पूरमापक पट्टी ओलांडून महापुराचा नवा विक्रम केला होता. पाटबंधारे आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील नियोजना अभावी महापुराने जे थैमान घातले त्याने नागरिकांचे आतोनात नुकसान झाले होते. मात्र तेव्हा 56 फुटांच्यावर गेलेली पातळी जानेवारी महिन्यात सहा फुटांवर आली आहे. सध्या हिवाळा सुरू असताना एवढ्यात ही पातळी खाली गेल्याने पाण्याच्या नियोजनांबद्दल संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या होत्या. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे जॅकवेल उघडे पडले होते. त्यातच महापालिकेचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली होती. 

दरम्यान शुक्रवारी कोयनेतून पाणी सोडल्याने आता खालावलेल्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून पाणी सोडले जात असून सांगलीतही नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने याबाबत खुलासा दिला असून पात्र कधीच पूर्ण कोरडे पडलेले नसून पाणी पातळी साडेचार फुटांपेक्षा खाली गेलेली नाही असे म्हटले आहे. तसेच पाण्याला दुर्गंधी येणे व पाणी प्रदूषित होणे याबाबी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित आहेत. त्यामुळे जलसंपदाकडून योग्य नियोजन होत असल्याचा दावा त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. 

कृष्णा नदीची पातळी पूर्ण कोरडी नाही

सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी पूर्ण कोरडी पडलेली नसून शुक्रवारी 6 फुटांवर आली होती. त्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडले जात आहे. आता पातळी वाढत होत आहे. आज (शनिवारी) पाणीपातळी दहा फुटांपेक्षा अधिक आहे. 
 हणमंत गुणाले, 
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT