Koyna Dam Patan Satara esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : 'सांगली पाटबंधारे'कडून मागणी होताच कोयना धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला

कोयना धरण (Koyna Dam) पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून (Sangli Irrigation Department) सिंचनाची मागणी वाढल्यामुळे काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजता रिव्हर स्लउईस गेटद्वारे होणारा ५०० क्युसेक विसर्ग वाढवून ९०० क्युसेक करण्यात येणार आला आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० व रिव्हर स्लउईस गेटद्वारे ९०० क्युसेक असा एकूण तीन हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात (Koyna River) करण्यात येत आहे.

कोयना धरण (Koyna Dam) पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग गेली अनेक दिवस सुरू आहे. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, पूर्वेकडे सिंचन व पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे नऊ नऊ मार्चला सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे दुपारी चार वाजता कोयना धरणाचे रिव्हर स्लउईस गेट उघडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता.

त्या वेळी कोयना नदीमध्ये एकूण २६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत होता. आज पुन्हा मागणी वाढल्याने रिव्हर स्लउईस गेटमधील विसर्ग ४०० क्युसेकने वाढवला असून, नदीपात्रात तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT