Nipani Bus Depo Sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : बसमधून प्रवासाला वाढता प्रतिसाद; आगाराच्या उत्पन्नात भर

उन्हाळा असूनही प्रवाशांची संख्या वाढल्याने निपाणी आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दोन वर्षापासून झालेले नुकसान आता थोडे थोडे भरून निघत आहे.

विकास पाटील

उन्हाळा असूनही प्रवाशांची संख्या वाढल्याने निपाणी आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दोन वर्षापासून झालेले नुकसान आता थोडे थोडे भरून निघत आहे.

निपाणी - वाढत्या महागाईसह इंधन दरात (Fuel Rate) झालेली वाढ, बदलत्या वातावरणाचा शरिरावर परिणाम होत असून विविध आजारांचा (Sickness) सामना नागरिकांना करावा लागत आहे. दुचाकीवरून प्रवास करताना उन्हाच्या (Heat) झळा तर बडवतातच, शिवाय इंधन दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक सध्या बसमधून प्रवास (Bus Journey) करण्याला पसंती देत असल्याचे चित्र निपाणीसह ग्रामीण भागात दिसत आहे.

उन्हाळा असूनही प्रवाशांची संख्या वाढल्याने निपाणी आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दोन वर्षापासून झालेले नुकसान आता थोडे थोडे भरून निघत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने बेळगाव, हुबळी, दावणगेरे, इचलकरंजी, हुपरीसह काही मार्गावर जादा बसेस सोडल्या जात आहेत. त्याचा निपाणी आगारासह प्रवाशांना फायदा होत आहे. दोन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी, महापुराचा फटका राज्य परिवहन महामंडळाला सोसावा लागला होता. सध्या आंतरराज्यसह स्थानिक बससेवा सुरळीत होत आहे. सर्व मार्गावरील बस पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.

`आपण कोल्हापूरजवळ कोगे या गावी जाणार होतो. इतरवेळी मी दुचाकीने जात होतो. मात्र तब्बल दोन वर्षानंतर बसप्रवास केला. त्यामुळे प्रवास चांगला व कमी खर्चात होऊन एक वेगळे समाधान वाटले.`

- पिंटू मोरे, बस प्रवासी, निपाणी

`वाढता उन्हाळा असला तरी सध्या बस प्रवासाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या मार्गावर जादा प्रवासी असतील, त्या मार्गावर अतिरिक्त बस सोडून प्रवाशांची सोय केली जात आहे.`

- मंजुनाथ हडपद, आगार व्यवस्थापक, निपाणी

दृष्टिक्षेपात...

गाव बसफेरया पूर्वीचे उत्पन्न आताचे उत्पन्न

बेळगाव 1 10 हजार 12 हजार

कोल्हापूर 1 13 हजार 16 हजार

हुपरी 1 5 हजार 8 हजार

दावणगेरे 1 15 हजार 20 हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT