Independence after 30 years in Shindewadi Gram Panchayat 
पश्चिम महाराष्ट्र

शिंदेवाडी ग्रामपंचायतीत 30 वर्षांनी सत्तांतर

निरंजन सुतार

आरग : शिंदेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत 30 वर्षांनी सत्तांतर झाले. माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते शंकर पाटील यांच्या 30 वर्षांच्या एकहाती सत्तेला धक्का बसला. शिंदेवाडीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. 

"जय हनुमान पॅनेल' ने परिवर्तन घडवून नऊ पैकी आठ जागा जिंकल्या. शंकर पाटील यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयानंतर "जय हनुमान पॅनेल' च्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव केला. तीस वर्षात विकासात खंड पडल्याने जनतेने परिवर्तनाचा कौल दिला. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी घरोघरी साखर वाटून आनंदोत्सव केला. 

सचिन पवार म्हणाले,""मतदारांनी विश्वास ठेवून विजयी कौल दिला. परिवर्तन घडवले. या विश्वासाला पात्र राहून अंतर्गत रस्ते, गटारी, गावातील मुख्य व शेत रस्ते आणि सुशोभीकरण करू. पुढील काळात गट न मानता गावच्या विकासासाठी 24 तास प्रामाणिकपणे काम करू असे म्हणाले. 

विजयी उमेदवार ः वॉर्ड 1 - उत्तम रघुनाथ पाटील, रूपाली पोपट माने, महादेव तुकाराम लवटे. 
वॉर्ड 2 - लक्ष्मण विलास साळुंके, सविता अविनाश पाटील, वंदना विजय पवार. वॉर्ड 3 - रेखाताई विठ्ठल सुतार, संदीप कृष्णा पाटील, भारती रामचंद्र पाटील.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स तेजीत?

Police Recruitment Death : बापाच्या डोईवरचं कर्ज उतरवायचं होतं, पण स्वप्न धुळीला मिळालं; पोलिस भरतीवेळी संग्रामचा मृत्यू चटका लावणारा!

Latest Marathi News Live Update : परभणीत शक्तीपीठ महामार्ग रदद् करण्यासाठी आंदोलन सुरु

मंदिर प्रवेशावरून वादानंतर हल्ला, २ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; कुटुंबियांचे गंभीर आरोप

बाबो...! मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? व्हायरल सेल्फीमधला तो व्यक्ती कोण?

SCROLL FOR NEXT