India Alliance Meeting Delhi esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगले, सातारा जागावाटप निश्‍चित; 'इंडिया' आघाडीचा निर्णय, कोण असणार उमेदवार?

सातारा लोकसभा पुन्हा एकदा खासदार श्रीनिवास पाटील हेच उमेदवार असतील असे संकेतही मिळत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्‍ट्रातील जागा वाटपाबाबत काल दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत झाली.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Loksabha Election) दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तर सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), खासदार शरद पवार आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. दरम्यान, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षाला गेल्याने कोल्हापूरच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा हक्क कायम असून ही जागा ठाकरे गटाला दिल्यास उमेदवार कोण याविषयी मात्र संभ्रमावस्था कायम आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्‍ट्रातील जागा वाटपाबाबत काल दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट, पवार गट व काँग्रेसकडेही ताकदीचा उमेदवार नाही.

ही बाब गृहित धरून ही जागा श्री. शेट्टी यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला. आजची बैठक ही प्राथमिक बैठक होती. या प्रस्तावाला शेट्टी यांचा होकार आहे का नाही हे समजल्यानंतर पुढील गोष्टी शक्य आहेत. सातारा लोकसभा पुन्हा एकदा खासदार श्रीनिवास पाटील हेच उमेदवार असतील असे संकेतही मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Video: 'तो' व्हिडीओ AI जनरेटेड? नितीश कुमार कुठे गायब झाले? 58 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Vaibhav Sooryavanshi: वैभव मला सर डॉन ब्रॅडमन यांची आठवण करू देतो, त्याची शैली अगदी त्यांच्यासारखीच; दिग्गज खेळाडूचा दावा

Live Marathi News Update : SFI च्या सह-सचिव आयशी घोष यांच्या विरोधात यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

Parliament News: १२-१२ तास काम करूनही बोलायला ३ मिनिटंच देताय; भडकलेले खासदार सभापतींना म्हणाले, तुम्ही १ दिवसाचे मुख्यमंत्री होतात...

Infosys News: फ्रान्सने इन्फोसिसवर ठोठावला 2 कोटींचा दंड! कामाच्या तासांमुळे कंपनी अडचणीत; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT