india emergency assembly election congress politics education Sakal
पश्चिम महाराष्ट्र

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

भारतातील आणीबाणीचा काळ हा २५ जून १९७५ ते १९७७ असा २१ महिन्यांचा कालावधी होता.

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड: भारतातील आणीबाणीचा काळ हा २५ जून १९७५ ते १९७७ असा २१ महिन्यांचा कालावधी होता. आणिबाणी मागे घेतल्यानंतर राज्यात १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा काँग्रेस विरुद्ध सारे पक्ष एकत्र येवून पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना झाली होती.

अपेक्षेप्रमाणे "पुलोआ'ने सत्ता मिळविण्यात यश मिळविले. त्यावेळचे राजकीय कार्यकर्तेही तात्विक विचाराचे होते. सर्वांच्या सभेसाठी गावात एकच व्यासपीठ असायचे आणि त्या व्यासपीठावर काँग्रेस, शे. का. प आणि पुलोआच्या नेत्यांच्या सभा व्हायच्या. निवडणूक संपेपर्यंत व्यासपीठ तसेच असायचे.

निवडणूक झाल्यानंतर जनता पक्षाचे लोकनेते राजामराबापू पाटील हे सहकार मंत्री झाले तर विधान परिषदेवर निवडून येऊन प्रा. एन. डी. पाटील हे शिक्षणमंत्री झाले. त्यावेळीं वाळवा तालुक्यात तीन आमदार झाले होते, त्यापैकी दोन मंत्री आणि निवडून येवूनही विलासराव शिंदे हे आमदार राहिले होते. आज तिन्ही नेते आपल्यात नाहीत.

तथापि पूर्वीचे नेते आणि कार्यकर्ते तात्विक विचारसरणीचे होते. एकाच व्यासपीठावर सभा घेणारे आणि मतदारही तितकेच समंजस होते सर्वांच्या सभा ऐकण्याची मानसिकता ठेवणारे. नाहीतर आजकालच्या राजकारणातील नेते, कार्यकर्ते आणि मतदार हे संधीसाधू झालेत. व्यासपीठावरच कुस्त्या खेळणारे आणि गुलाल तिकडे चांगभले करणारे..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT