Indian Pitta Bird esakal
पश्चिम महाराष्ट्र

Indian Pitta Bird : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पावसाच्या आगमनाची 'नवरंग'नं दिली चाहूल

पावसाच्या प्रतीक्षेत असताना नवरंग पक्षी दिसल्यास पाऊस येणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवतात.

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करतात. त्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असताना नवरंग पक्षी दिसल्यास पाऊस येणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवतात.

निपाणी : मौसमी पावसाच्या (Rain) आगमन व निर्गमनात गेल्या काही महिन्यात सातत्याने बदल झालेला आहे. मौसमी पावसाच्या आगमन, निर्गमनाचे वेळापत्रकच बदलले आहे. त्यामुळे वेधशाळेचा अंदाजही अनेकदा चुकीचा ठरत आहे.

मॉन्सूनच्या आगमनाची साऱ्यांना "अॅडव्हान्स चाहूल" देणाऱ्या नवरंग पक्ष्याचे (Indian Pitta) निपाणीजवळील तवंदी घाट (Tavandi Ghat) परिसरात आगमन झाले आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार असल्याच्या वेधशाळेच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा मिळत आहे. श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असे स्थलांतर करणारा नवरंग मॉन्सूनचा अंदाज येताच भारतात येतो.

मैनेएवढा भडक रंगाचा आणि भुंड्या शेपटीचा हा पक्षी रंगाने हिरवा आहे. निळा, तांबूस, काळा आणि पांढरा असा वरच्या अंगाचा रंग असून पोट आणि शेपटीचा खालचा भाग किरमिजी रंगाचा आहे. मनुष्यवस्तीच्या जवळ वा ओढे, नाले यांच्या सभोवतालच्या दाट झुडपात सर्रासपणे आढळतो.

मे ते ऑगस्ट हा त्याच्या विणीचा हंगाम आहे. गवत, काटक्या, वाळलेली पाने आदींपासून मोठे गोलाकार घरटे जमिनीवरील झुडपाच्या बुंध्याशी किंवा झाडावर बांधून त्या ठिकाणी नवजीवांना जन्म देतो. काही दिवसांपूर्वी निपाणी परिसरात नवरंग पक्ष्याचे आगमन झाले असून त्याचे ठिकठिकाणी दर्शन होत आहे. त्यामुळे एक दोन वळीव पाऊस होताच मान्सूनला प्रारंभ होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचा नवरंगवर विश्वास

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करतात. त्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असताना नवरंग पक्षी दिसल्यास पाऊस येणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवतात. त्यानुसारच पेरणीच्या हंगाम ठरवून पेरणी केली जाते

दृष्टिक्षेपात नवरंग पक्षी....

  • इंग्रजी नाव : इंडियन पिट्टा

  • हिंदी नाव: नवरंग

  • मराठी नाव : बहिरा पाखरू, बंदी, खाटिक, गोळफा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT