पश्चिम महाराष्ट्र

भोजचे जवान विनय भोजे यांचा सेवा बजावताना हृदयविकाराने मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये फार थंडी असल्याने व तेथे बर्फाळ भाग असल्याने विनय यांचा ऑक्सिजन कमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

मांगुर : भोज गावचे सुपुत्र जवान विनय बाबासाहेब भोजे-पाटील (वय 37, सध्या रा. तिळवणी, ता. हातकणंगले) यांचा सैन्यदलात सेवा बजावत असताना सोमवारी (ता. 17) ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विनय भोजे-पाटील हे भोज गावचे सुपुत्र असले तरी तिळवणी येथे वास्तव्यास होते. तेथूनच ते सैन्यदलात भरती झाले होते.

सध्या जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच कडाक्याची थंडी जाणवत होती. जम्मू-काश्मीरमध्ये फार थंडी असल्याने व तेथे बर्फाळ भाग असल्याने विनय यांचा ऑक्सिजन कमी झाला. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच ते सेवा बजावत असतानाच मयत झाले.

विनय भोजे-पाटील हे येत्या मार्च 2022 ला सैन्यदलातून निवृत्त होणार होते. पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाची माहिती कळताच भोज-भोजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विनय यांनी भोज गावी दुसरीपर्यंत शिक्षण घेतले होते. वास्तव्यास तिळवणी येथे असले तरी आपल्या भोज या जन्मगावी सुटीवर आल्यानंतर येऊन सर्वाना भेटून जात होते. त्यांच्या निधनामुळे भोज परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. विनय यांचा मृतदेह तिळवणी येथेच आणण्यात येणार असल्याचे समजते. विनय यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT