belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साजरा करण्यात आला 'इन्फन्ट्री डे'

मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल केंद्रात साजरा करण्यात आला

विनायक जाधव

बेळगाव : येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल केंद्रात १९४७ साली झालेल्या भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'इन्फन्ट्री डे' बुधवारी (ता. २७) साजरा झाला. दरवर्षी २७ ऑक्टोबरला मराठा इन्फन्ट्रीकडून हा दिवस साजरा केला जातो. पण यंदा तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लढलेल्या कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यात आला. कॅम्पमधील महिला पोलीस स्थानकातील महिला कॉन्स्टेबल, सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या आया आणि नर्स, तसेच मिलिटरी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स यांचा यावेळी सत्कार झाला. आर्मी वाइफ वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने या महिलांचा सन्मान झाला.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी विशेष प्रशंसा प्रमाणपत्र देऊन कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला. प्रारंभी शरकत युद्ध संग्रहालय येथे जाऊन शहिदाना मानवंदना देण्यात आली. नंतर हा सन्मान कार्यक्रम झाला. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानला काश्मीरमधून हद्दपार करण्यासाठी भारतीय लष्करातील शीख रेजिमेंटची पहिली तुकडी काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर उतरली होती. त्यानंतर भारताने या युद्धात पाकिस्तानी लष्कराचा पराभव केला होता. त्यामुळे या दिवसाला 'इन्फंट्री डे' म्हणून दर वर्षी भारतीय लष्कराकडून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Cryptic Post: खरा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा...; विराटच्या पोस्टने सारे चक्रावले, गौतम गंभीरच्या 'त्या' सूचक इशाऱ्याला दिले उत्तर

'यंदा गोविंदबागेत दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबीयांचा निर्णय'; काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्या काकी...'

Gold Rate Today : सोन्याची पुन्हा भरारी, चांदीच्या भावातही वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

आम्ही पुढं जातोय हे तुम्हाला नकोय; पुण्यातल्या कॉलेजमुळे लंडनमधील नोकरी गेली; तरुणाचा VIDEO VIRAL

अभिनेत्रीच्या स्विमिंग पूलमधील फोटोवर आक्षेपार्ह कमेंट; दिशाने ट्रोलला दिलं कडक उत्तर, म्हणाली...'माननीय महोदयांना...'

SCROLL FOR NEXT