corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कवलापूरला कोरोनाचा शिरकाव 

विष्णू मोहिते

कवलापूरला कोरोनाचा शिरकाव 

कवलापूर, ः येथील एक महिला व तिच्या बहिणीचा मुलगा असे कोरोना बाधित झालेत. हे दोघे बेळंकी येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने तातडीने चावडी मागील भागात कंटेन्मेंट झोन तयार केला.

रूग्णाच्या संपर्कातील सात जणांना संस्थात्मक तर 16 जणांना होम क्वारंटाईन केले. आरोग्य विभागाच्या 10 टीमने सुमारे 489 कुटुंबातील 2300 ग्रामस्थांच्या आरोग्याचा सर्व्हे पूर्ण केला. दरम्यान, कवलापूर गावात पाच दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बेळंकी येथील वृध्द दापत्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात कवलापूर येथील एक महिला व तिची मुलगी आली होती. त्यांचा एक तरूण नातेवाईक कवलापुरला आला होता. कवलापूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी तिघांची तपासणी केली. 36 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

माहिती मिळताच कवलापूर येथील कोरोना नियंत्रण समितीचे प्रकाश हाक्के, बजरंग पाटील, निवासबापू पाटील, भानुदास पाटील, संपत पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एल. शेळके यांच्या पथकाने धाव घेतली. आरोग्या तपासणीत हायरिस्क व्यक्ती, साठ वर्षांवरील जेष्ठ, गंभीर आजारी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रूग्णांची यादी तयार करण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळून कवलापुरातील इतर सर्व व्यवहार पाच दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Robbery Case : तुकाराम मुंडेंच्या घरावरील दरोड्यातील पाच जणांची टोळी जेरबंद; फार्म हाऊसवरही टाकला होता दरोडा

Maharashtra Government: जमिनीचा मालक कोण, हे आता सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येणार ‘लँड टायटलिंग ॲक्ट’; फसवणुकीला बसणार आळा?

Solapur News: सोलापूर विद्यापीठाचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! जनावरांसाठी पेरणार १०० एकरांवर मका; शेतकऱ्यांना मिळणार मोफत चारा

Latest Marathi News Live Update : न्यायालयाबाहेरील गोळीबार प्रकरण; मंदार किवळेची तब्येत अजूनही गंभीर, सहा आरोपी २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत

IND vs NZ 2nd Test Live: शून्य धाव, ३ विकेट्स! भारतीय गोलंदाजांनी गेम पलटवला, न्यूझीलंडच्या डेंजर फलंदाजांना पाठवले माघारी

SCROLL FOR NEXT