abhijit choudhari.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती पोलिसांना द्या 

सकाळवृत्तसेवा

सांगली-"कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांना "कोरोना'ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असून एक मार्चनंतर विदेशातून जिल्ह्यात आलेल्या सर्व नागरिकांची माहिती पोलिसांना द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आरोग्य विभागाला शनिवारी दिले. दरम्यान जिल्ह्यात अद्यापही टॅंकर आणि कंटेनरमधून प्रवाशांची वाहतूक सुरू असून ती तात्काळ थांबवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. 

"कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. इस्लामपूर येथे हज यात्रेवरून आलेल्या चौघांना "कोरोना' ची लागण झाल्याचे प्रथम निदर्शनास आले होते. त्यानंतर संबंधित चौघा यात्रेकरूंच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील "कोरोना' रुग्णांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात अद्यापही काही विदेशातून जाऊन आलेले नागरिक दाखल होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सर्व स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.

विदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एक मार्च पासून जिल्ह्यात विदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची माहिती आरोग्य विभागाने पोलीस खात्याकडे सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या यादी व्यतिरिक्त अन्य कोणीही परदेशात जाऊन आलेले आढळल्यास त्यांच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

"कोरोना' ला रोखण्यासाठी तसेच त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील सीमा रोखण्यात आल्या आहेत. प्रवासी आणि माल वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र काही प्रवासी टॅंकर आणि कंटेनरमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात सर्व हद्दीतून प्रवेश करणाऱ्या तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी.

बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. मालवाहतूक करणाऱ्या गाड्यातून प्रवासी वाहतूक होत असल्यास त्याची माहिती संबंधित तालुक्‍यातील तहसीलदारांना तत्काळ द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT