बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेले आणि स्वराज्य निर्मितीत महत्वाची भुमिका बजावलेले अनेक किल्ले सीमाभागात आहेत. मात्र या किल्लांमध्ये लक्ष न दिल्याने अनेक किल्लांची पडझड होत असल्याने गड किल्लांच्या संवर्धनासाठी बेळगावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सीमाभागातील गड किल्लांचे रुप पालटत असुन अनेक जुन्या वस्तु पुन्हा प्रकाशात येण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगाव शहरापासुन जवळ असणाऱ्या गड किल्लांना मोठा इतिहास असुन देखिल या गड किल्लांच्या संवर्धनासाठी सरकार पुढे येत नाही. त्यामुळे दुर्गवीर प्रतिष्ठानने चंदगड, बेळगाव व इतर भागातील गडांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन युवकांना केले होते. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी सातत्याने युवकांशी संपर्क साधुन कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे कलानिधी गड, सडा किल्ला व वल्लभ गडाची डागडुजी करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासुन सुरु असुन किल्लावरील अनेक अडगळीत पडलेल्या वस्तु पुन्हा सुव्यवस्थित केल्या जात आहेत. तलाव व विहीरात अनेक वर्षांपासुन साचलेला गाळ काढण्याचे कामही करण्यात आले आहे. तसेच बुरुंजावर साचलेली झाडे, झुडपे तोडुन परीसर स्वच्छ केला जात आहे. त्यामुळे गडांना, पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होत असुन गडांच्या संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. हे गडांजवळ राहणाऱ्या लोकांना पटवुन देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनाही गडांचे महत्व पटले आहे.
मात्र गडांवर अनेक कामे बाकी आहेत. त्यामुळे या कामात अधिक युवक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी कलानिधी गडावर जाऊन कार्य करणाऱ्यांमध्ये शहरातील अभिजीत अष्टेकर, बाबु हणमशेठ, सागर बिर्जे, सागर मुतगेकर, संजय गावडोजी, भावनेश पिंगट, राहुल कामानाचे, अमोल केसरकर, किरण बडवाण्णाचे, उमेश बिर्जे, सचिन पाटील, बाळु पाटील, प्रकाश पाटील, राजेश कोळवणकर, नितिन पाटील तर चंदगडच्या विविध भागातुन संदीप गावडे, अजित पाटील, अजय सातोर्डेकर, नितिन सुतार, बाबु झोरे, नामदेव सदावर, दिंगबर भाटे, कृष्णा सुफाल, पुंडलकी भांबर, राजु सुतार, भोगोजी लांबोर, ऋषीकेश सुतार, संभाजी सावंत, राजु पेडणेकर यांचा समावेश आहे.
हेही वाचा- अंबाबाई मंदिरासह प्रेक्षणीय स्थळे गेली गजबजून -
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अनेक वर्षे किल्लांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. याला हातभार लावण्यासाठी शहरातील युवकांनी कलानिधी गडावर जाऊन विविध कामे हाती घेतली आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील अनेक कार्यकर्तेही सहभागी होऊ लागले असुन सडा व वल्लभ गडावर देखिल काम सुरु आहे. या कामात जास्तीतजास्त युवकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.
अभिजीत अष्टेकर, दुर्गवीर
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.