water 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील  आठ गावांच्या पाणी योजनांची चौकशी 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः राष्ट्रीय पेयजल योजनेतून काम झालेल्या जिल्ह्यातील आठ पाणी योजनांच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिले. त्यात साडगेवाडी, बांबवडे, तुपारी, मर्दवाडी, वायफळे, घोगाव, रामापूर, सूर्यगावचा समावेश आहे. या संपूर्ण योजनांची तांत्रिक तपासणी, पाणीपुरवठ्याचे तपशील सादर करण्यासाठी एकूण बारा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुर्ली (ता. पलूस) येथील पाणी घोटाळ्यातील अटकेत असलेल्य संजय पवार याच्याशी संबंधित या योजना असून त्यामुळे तेथील पाणी पुरवठा समित्यांचे धाबे दणाणले आहेत.

 
बुर्ली (ता. पलूस) येथे 1 कोटी 14 लाख रुपयांचे पाणी योजनेचे काम पत्नीच्या नावे स्थापन झालेल्या बोगस कंपनीला देण्याचा गंभीर प्रकार संजय पवार यांनी जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यानेच केला होता. त्याची चौकशी चंद्रकांत गुडेवार यांनी केली. त्यानंतर त्यावर गुन्हा दाखल करून पवार याला काल पलूस येथे पोलिसांनी अटक केली. पवार याचा सहभाग असलेल्या अन्य आठ योजनांची कागदपत्रेही श्री. गुडेवार यांनी मागवली होती. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांनी आता संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. 
साडगेवाडी आणि बांबवडे योजनेच्या चौकशीसाठी शिराळा येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी ए. पी. मुलाणी, तासगावचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी जे. जे. थोरात, शिराळ्याचे शाखा अभियंता बी. बी. हुक्कीरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तुपारी आणि मर्दवाडी गावांच्या चौकशीसाठी वाळवा तालुका उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस. बी. गायकवाड, आटपाडीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. एस. जोशी आणि आटपाडीचे शाखा अभियंता आर. व्ही. शेडगे यांची नेमणूक केली आहे. वायफळे आणि घोगाव योजनांची चौकशी विट्याचे प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी डी. डी. कांबळे, मिरजचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. व्ही. व्हनखंडे, मिरजचे शाखा अभियंता ए. जी. चव्हाण हे करतील. रामापूर आणि सूर्यगावची चौकशी उपअभियंता यांत्रिकी यू. ए. देशपांडे, सांगलीचे शाखा अभियंता एस. टी. बोतालजी, ग्रामीण पाणीपुरवठाचे शाखा अभियंता जी. के. मोटे हे चौकशी करणार आहेत. 


या योजनांची तांत्रिक तपासणी केली जाईल. गावकऱ्यांना पाणी मिळते की नाही, हेही नियमित तपासले जाईल. ट्रायल पीट घेऊन पाईप लाईनची खोली मोजली जाईल. त्याचा संपूर्ण तपासणी अहवाल सादर करावा असे म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT