पश्चिम महाराष्ट्र

अंकलखोपमध्ये सापडलेल्या 950 वर्षांपूर्वीच्या शिलालेखात काय लिहलंय?

सकाळ वृत्तसेवा

जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे.

अंकलखोप : येथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकिर्दीतील इसवी सन १०७७ सालचा जैन शिलालेख सापडला आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. महेंद्र बाळकोटगी यांनी याचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्यावेळी कराड प्रांतात होता, हे या शिलालेखातून स्पष्ट होते. जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या अंकलखोप गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील औदुंबर दत्त मंदिर व म्हसोबा देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात मोठी ऐतिहासिक परंपरा या गावाला आहे. येथील शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी गावात शिलालेख असल्याची माहिती समाधीकोशकार प्रवीण भोसले यांच्या मार्फत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना दिली. हा शिलालेख अंकलखोप मधील जैन गल्ली रोडलगत चौगुले यांच्या घराच्या अंगणात आहे. या ठिकाणी गजलक्ष्मीचे शिल्प असून ते भावकाई म्हणून पूजले जाते. याच गजलक्ष्मी मागे शिलालेख असलेली दगडी शिळा मातीत पुरून ठेवण्यात आली आहे.

दरवर्षी आषाढ अमावास्येला भावईच्या मानकऱ्यांसमोर ही शिळा काढून त्या खाली मडक्यात दिवा ठेवण्यात येतो. या शिळेवर अक्षरे असल्याचे मानकऱ्यांना माहीत होते. मात्र, ती वाचता येत नसल्याने ही दरवर्षी बाहेर काढून धार्मिक विधी झाला की मुजविण्यात येत असे. गावातील इतिहासप्रेमी, शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी या शिळेवरील अक्षरांचा छडा लावायचा असा निश्चय केला. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना बोलावून गावातील मानकऱ्यांसमोर शिलालेख असलेली शिळा बाहेर काढण्यात आली. या शिलालेख अभ्यासासाठी डॉ. जयवर्धन पाटील, शिवव्याख्याते अतुल पाटील, प्रणव देशपांडे, महेश चौगुले, श्रद्धेश गायकवाड, राहुल चौगुले, शिरीष गुरव, प्रा. प्रताप पाटील, डॉ. रोहित सकळे, सागर कांबळे (शंबर्गी), सर्व मानकरी, युवक आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिलालेखावर मध्यभागी पद्मप्रभ तीर्थंकरांची प्रतिमा, बाजूला गाय-वासरू आणि सूर्य- चंद्राचे शिल्पांकन आहे.

खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचे वाचन करून दिले. या शिलालेखात एकूण ६१ ओळी आहेत. या शिलालेखात त्रिभुवनमल्ल म्हणजेच चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे. चालूक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. त्याने ५० वर्षे राज्य केले. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तमीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. अंकलखोपच्या या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी याने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. त्यासाठी ९ एप्रिल १०७७ रोजी हा दान लेख लिहून ठेवला. हा जोगम कलचुरी त्यावेळी विक्रमादित्याच्या वतीने कराड प्रांताचा कारभार पाहत होता.

काय आहे शिलालेखात

अंकलखोप येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रमादित्यासह त्याचा महामंडलेश्वर जोगम कलचुरी यांची विशेषणे लिहिण्यात आली आहेत. शके ९९९, पिंगल संवत्सरे, वैशाख शुद्ध त्रयोदशी बृहस्पतीवासरे असा कालोल्लेख आहे. जैन धर्मातील यापणीय संघातील वृक्षमूल गणातील जैन साधूची ही बस्ती असून त्याच्या जीर्णोद्धारासाठी दान दिल्याचे म्हटले आहे.

अंकलखोप होते कराड प्रांतात

सध्या सांगली जिल्ह्यात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी करहाड-४००० या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख 'अंकुलखप्पु' असा आला आहे. जोगम कलचुरी हा कराड येथे वास्तव्यास असताना त्याने हे दान दिल्याचा उल्लेख असून त्याकाळी अंकलखोप हे भरभराटीस आल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Pimpri-Chinchwad Update : सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ‘स्मार्ट सिटी’त पालिकेकडून ‘स्टार्ट अप’ने मुहूर्तमेढ

Punawale Traffic Jam : ‘एमएनजीएल’ वाहिनी फुटून वायुगळती, हजारो ग्राहकांना फटका; पुनावळे भुयारी मार्गाजवळ तीन तास कोंडी

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

PMC News : पांडवनगरमधील दीड हजार रहिवासी धोक्यात; महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झाडं घरात!

SCROLL FOR NEXT