Inspirational stories of Bhanudas Patare 
पश्चिम महाराष्ट्र

एक हात तुटलाय... दुसरा तर शाबूत हाय

सतीश वैजापूरकर

शिर्डी : 'हात तुटला म्हणून काय झाले? पाऊणशे वयमान झाले म्हणून काय झाले? घरी बसून कसे चालेल? जगण्याची लढाई लढायलाच हवी! एका हाताने मोटरसायकल चालवतो. भाजीपाला विकून संसाराचा गाडा हाकतो...' तालुक्‍यातील रुई येथील रहिवासी भानुदास पठारे "सकाळ'शी बोलताना अभिमानाने सांगत होते... त्यांची ही दिनचर्या हृदय पिळवटणारी; पण तरुणांनाही लाजवणारी आहे... 

मळणी यंत्रात गुंतून त्यांचा हात कोपरापर्यंत तुटला. जखम बरी होताच ते नव्या उमेदीने कामाला लागले. मोटरसायकलवर भाजीपाला बांधून आठवडेबाजारात विकू लागले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण करण्याचा मार्ग त्यांनी शोधला.

घरी बसून खाता काय?

वयाची पंच्याहत्तरी उलटली. या वयातही पंचवीस ते तीस किलो वजनाचा भाजीपाला मोटरसायकलला बांधून ते बाजारात जातात. भाजीपाल्याचे वजन तोलत एका हाताने मोटरसायकल चालविण्याचे त्यांचे कसब पाहून भलेभलेही अचंबित होतात. त्यांना मात्र त्याचे काही वाटत नाही. "घरी बसून खाता काय? असा सवाल ते समोरच्याला विचारतात. 

स्वत:लाच लढ म्हणतो

हात नाही, मग गुजराण करायची कशी? असा प्रश्‍न मला कधीच पडला नाही. एक हात तुटलाय... दुसरा तर शाबूत हाय... हा दुसरा हात आता दुप्पट काम करू लागलाय... ही जगण्याची लढाई, मी स्वतःलाच लढ म्हणतो... एका हाताने मोटरसायकल चालवायचं मला काहीच वाटत नाही,' असे सांगत आलेल्या अपंगत्वावर आपण कशी मात केली, हे ते सहजपणे सांगतात.

धंद्यात तेजी-मंदी असतेच

भाजीपाला विकून चार पैसे मिळतात. नाही असे नाही. मात्र, हजार रुपयांच्या भांडवलात असे किती पैसे मिळणार? तेजी-मंदी सुरूच असते. कधी कधी रिकाम्या हाताने परतावे लागते. देव कुटुंबाचा गाडा चालविण्याची शक्ती या वयातही देतो हे काय कमी आहे का? कुटुंबाचा गाडा चालतो हे काय थोडे आहे?... अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT