International Society for Optics and Knicks, an American organization called Optics Selection for priti jagdale sangli 
पश्चिम महाराष्ट्र

संशोधक प्रितीनं वेधलं अमेरिकेच लक्ष: जगभरातून २५ लोकांची निवड

सकाळ वृत्तसेवा

सांगली : इंटरनॅशनल सोसायटी फॉर ऑप्टिक्‍स अँड निक्‍स या अमेरिकन संस्थेने ‘ऑप्टिक्‍स’ या विषयावरील संशोधनासाठी जगभरातून २५ लोकांची निवड केली आहे. त्यात प्रीती जगदेव हिला संधी मिळाली. भारतातून ती एकमेव आहे. एन.आय.टी. गोवा येथे ती तरुण संशोधक म्हणून काम करीत आहे. गुरू परिवाराच्या सदस्या पद्मजा जगदेव आणि गोवा येथील महावीर जगदेव यांची ती कन्या आहे. 


प्रीतीचे शिक्षण वास्कोतील सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट आणि एम.ई.एस. ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. तिने डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेन्टेशनमधून एमई झाली. जागतिक संशोधनासाठी एन.आय.टी. गोवा येथे प्रवेश घेतला. एनआयटीचे संचालक गोपाळ मुगेराया व संशोधन मार्गदर्शक डॉ. ललाट इंदूगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ती काम करते. गतवर्षी ब्राझील येथे संशोधन पेपर सादर केले. टोकिओ, अमेरिका व भारतातही तिने प्रभाव पाडला. 


अमेरिकन संस्था एसपीआयई जगभरातील ऑप्टिक्‍स सायन्स, इंजिनिअरिंग, गणित क्षेत्रातील संशोधक महिलांची निवड करते. प्रीती सध्या गोव्यात ‘इन्फ्रारेड थर्मोग्राफी’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची आरोग्य नियंत्रणात उपयुक्तता’ विषयावर संशोधन करतेय. थर्मोग्राफी ही इन्फ्रारेड कॅमेराद्वारे केली जाणारी चाचणी असून, त्याद्वारे रक्तप्रवाह आणि शरीरातील उतीचा उपयोग यांचे नमुने तपासता येतात. याचा स्तनाच्या कर्करोग निदानासाठी सुद्धा उपयोग आहे. जगभरातील संशोधक इन्फ्रारेड कॅमेऱ्यावर काम करीत असून, त्याद्वारे कातडीच्या तापमानातील तफावतीची नोंद करणे शक्‍य आहे.


राजमती भवनात भारतीय जैन संघटना आणि गुरू परिवारातर्फे माजी महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. भारतीय जैन संघटनेचे राज्य संचालक राजगोंडा पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, गुरू परिवारचे धन्यकुमार शेट्टी, सरोज शेट्टी, रावसाहेब माणकापुरे, संजीव उपाध्ये, व्ही. डी. वाजे उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT