international standard badminton hall 
पश्चिम महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंटन हॉल सज्ज

अमित आवारी

नगर, ः जिल्हा क्रीडा संकुलात 2 ते 7 जानेवारी 2020 या काळात 19 वर्षांखालील मुला-मुलींची राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नगरमधील बॅडमिंटन हॉल आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाल्यास जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना जागतिक दर्जाचे मैदान सरावासाठी मिळणार आहे. त्यातून जिल्ह्यातून राष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात 2004 मध्ये राज्यस्तरीय दर्जाचा नवीन बॅडमिंटन हॉल तयार करण्यात आला होता. त्यात जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहेत. नगरमध्ये पहिल्यांदाच अशी राष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन स्पर्धा होत आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. सध्या या बॅडमिंटन हॉलमध्ये आठ कोर्ट आहेत. त्यांची संख्या आता दहा करण्यात येणार आहे. त्यातील दोन कोर्ट केवळ सरावासाठी असतील. सध्याचे कोर्ट वूडन फ्लोरिंगचे होते. हे कोर्ट बसवून सुमारे 11 वर्षे झाली होती. 


जिल्हा क्रीडा संकुलाने कात टाकली 

जिल्हा क्रीडा संकुलात असलेले मुख्य स्टेडियम सुमारे 35 वर्षांपूर्वीचे आहे. स्टेडियमचा एक भाग तुटून लहान मुलीच्या डोक्‍यात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल तयार करताना या मुख्य स्टेडियमच्या दर्शनी भागात पुन्हा प्लास्टर करण्यात आले. याला 15 वर्षे झाली होती. दर्शनी भागातील प्लास्टर भिंतीला योग्य प्रकारे न बसल्याने निघू लागले होते. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने या दर्शनी भागाचे पुन्हा प्लास्टर व रंगकाम केले जात आहे. बॅडमिंटन हॉलच्या प्रांगणात कॉंक्रिटीकरण, हॉलमध्ये अत्याधुनिक उच्च दर्जाचे एलईडी दिवे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. ओपन जिमजवळ ब्लॉक बसविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT