Interviews by 16 aspirants for "that" position 
पश्चिम महाराष्ट्र

"त्या' पदासाठी 16 इच्छुकांनी दिल्या मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा

नगर : प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सूचनेनुसार युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली. तब्बल 16 इच्छुकांनी मुलाखती दिल्याने, निवड समितीचीही कसरत झाली. 

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. त्यासाठी नुकत्याच कालिका प्राइड, लाल टाकी येथील कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. निरीक्षक म्हणून निवड समिती सदस्य व प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुमीत भोसले, अभय देशमुख यांची उपस्थिती होती. 

शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, मयूर पाटोळे, मुबीन शेख, योगेश काळे, हारून इनामदार उपस्थित होते. ""निवड समिती सदस्य हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे यांची भेट घेणार आहेत. स्थानिक नेत्यांशी इच्छुकांबाबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सादर करणार आहेत. तूर्तास इच्छुकांची निवड प्रदेश कार्यालयातर्फे घोषित होईल,'' असे निरीक्षक सुमीत भोसले यांनी सांगितले. 

यांनी दिल्या मुलाखती 
स्मितल वाबळे (श्रीगोंदे), ऋषिकेश मुळे, कृष्णा शेळके (कर्जत), संचित गिरमे, शरद निरंजन पवार, सचिन रणदिवे (श्रीरामपूर), मोहसीन शेख, मंगल भुजबळ (नगर शहर), राजू बोरुडे (राहुरी), संदीप दरंदले (नेवासे), प्रसाद शेळके (शिर्डी), श्रीकांत दंडवते (राहाता), राहुल उगले (जामखेड), सिद्धेश खिलारी (पारनेर), तुषार पोटे (कोपरगाव), ऍड. अक्षय कुलट (नगर तालुका) आदी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT