Investigate corruption in Khatav grampanchayat; Statement to Chandrakant Gudewar 
पश्चिम महाराष्ट्र

खटावमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा; चंद्रकांत गुडेवार यांना निवेदन

निरंजन सुतार

आरग : खटाव (ता. मिरज, जि. सांगली) येथील ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामासह इतरही विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता प्रशराम बनसोडे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

चौदाव्या वित्त आयोगाच्या सर्वच कामांमध्ये अनियमितता, भ्रष्टाचार व कामे निकृष्ट झालेली आहेत. खटाव दलित वस्ती येथील नळ पाणी पुरवठा योजना व सार्वजनिक शौचालयाचे काम रखडले असून, त्याची चौकशी करण्यात येऊन कामे मार्गी लावावीत. हनुमान मंदिर येथे दर्गा चौक परिसरात पेविंग ब्लॉक न बसवताच पूर्ण बिल काढण्यात आले आहे. दलित वस्तीतील स्मशानभूमीचे अर्धवट कामाचे पूर्ण बिल काढले आहे.

ग्रामपंचायत ते मल्लाप्पा कांबळे घरापर्यंत डांबरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. शिलाई मशीन क्‍लास अर्धवट घेऊन पूर्ण बिल काढण्यात आले आहे. गावातील मुताऱ्यांची झालेली दुरवस्था व काम न करताच काढण्यात आलेले बिल, वर्तमानपत्रांमध्ये कोणत्याही कामाची जाहिरात किंवा निविदा प्रसिद्ध न करताच कामे केली. कोरोना काळात खर्च झालेल्या एकूण रकमेची सखोल चौकशी करण्यात यावी.

दिव्यांगांसाठीचा पाच टक्के निधी आजपर्यंत खर्च करण्यात आला नाही. गावाची एकूण घरपट्टी व पाणीपट्टी वसुली न केल्याने 25 लाख रुपये थकीत आहे. वरील सर्व कामांची सखोल चौकशी करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई

तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन विभाग व मिरज पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना चौकशीचा आदेश देण्यात आलेले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. 
- चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 

चौकशी होऊ दे आणि झाली पाहिजे

संबंधित कामे पारदर्शक व चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहेत. कुठेही भ्रष्टाचार किंवा शासकिय निधीची लूट करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत भ्रष्टाचारमुक्तसाठी काम केले आहे. त्यामुळे चौकशी होऊ दे आणि झाली पाहिजे. 
- बी. एल. पाटील, माजी ग्रामसेवक, खटाव  

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT