Investigation of the distribution of aid to the flood affected people in Dhavali 
पश्चिम महाराष्ट्र

ढवळीत पुरग्रस्तांच्या मदत वाटपाची चौकशी सुरु

सकाळवृत्तसेवा

म्हैसाळ : मिरज तालुक्‍यातील ढवळी येथील पूरग्रस्तांसाठी आलेल्या साहित्यांचे वाटप न करणे आणि पात्र पुरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली.

महापुराने उद्धस्त ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कारभाराचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. दोनशेवर घरांचे नुकसान झाले असताना 52 जणांची यादी पंचायत समितीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांना गदारोळ केला. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ढवळीत भेट दिल्यावर महापुराच्या काळात पुरग्रस्तांसाठी आलेले मदत साहित्याचे वाटप न करताच ग्रामपंचायतीत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला.

याची चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली होती. श्री. राऊत यांनी श्री. पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. श्री.पवार यांनी ग्रामपंचायतीत माहिती घेतली. चौकशीसाठी दफ्तरही ताब्यात घेतले. दरम्यान ग्रामस्थांनी मागणीचे निवेदनही दिले. 

ग्रामसेविका त्रिशला माणगावकर यांच्या चौकशीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पूर ओसरल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या स्वच्छतेसाठी बिल खर्ची टाकले आहे. स्मशानभूमीचे काम अपूर्ण असताना ठेकेदारास बिल दिले आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी श्री. पवार यांच्याकडे केली आहे. स्वप्नील बनसोडे, आकाश गौराजे, अक्षय पाटील, चेतन स्वामी, प्रमोद कांबळे, पवन कुगे, नागेश पाटील, रावसाहेब पाटील, सुनिल कांबळे, सचिन चौगुले, श्रीराम चौगुले यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

दोषींवर निश्‍चित कारवाई

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीसाठी दप्तर ताब्यात घेतले आहे. दोषींवर निश्‍चित कारवाई होईल.

- संदीप पवार, चौकशी अधिकारी तथा बीडीओ 

ग्रामस्थांचा चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष निषेध

घरभाड्याच्या मदतीसाठी लाभार्थींनी अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीने दवंडी देऊन, नोटीसीद्‌वारे आवाहन करण्याच्या सूचना 14 नोव्हेंबर 2019 रोजी मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचाही ग्रामस्थांनी चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेबाबत भाजप नेत्यांचा मोठा विश्वास

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Pune Crime : पुण्यात सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोरच भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

SCROLL FOR NEXT