tanajimane
tanajimane 
पश्चिम महाराष्ट्र

रामापूरच्या तानाजीची सोशल मीडियावर धूम

दीपक पवार

आळसंद - ठिकाण वाडी रत्नागिरीचे जोतिबा मंदिर... गुलालात न्हालेले भाविक... वेगवेगळी वाद्यांचा सुरू असलेला गजर.. त्यातच एका अवलियाने ट्रंपेट तोंडाला लावला आणि आयपीएलची धून वाजवली अन्‌ उपस्थितांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडिओ पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरला झाला आणि ट्रंपेटच्या धूनवर जल्लोष करायला लावणारा हा अवलिया कोण याचा शोध सुरू झाला. अनेकांना ताल धरायला लावणारा हा कलाकार आहे कडेगाव तालुक्‍यातील रामापूरचा तानाजी माने. 

रामापूर हे कडेगाव तालुक्‍यातील येरळाकाठावर वसलेले टुमदार गाव. साथी बा. न. राजहंस यांचे गाव. डाव्या चळवळीचा प्रभाव आजही या गावावर कायम आहे. याच परंपरेत वाढलेला तानाजी. शिक्षण फक्त आठवी. परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी ब्रॉस बॅन्डमध्ये मदतीला घेतले अन्‌ त्याचे कलेशी नाते जोडले. विविध समारंभात वाजंत्री म्हणून काम करत पोटपाणी सांभाळणारा तानाजी हा तिसऱ्या पिढीतला. आजोबा, वडील हेही कलाकार. कलेचा वारसा मिळाला तो वडिलांकडून. 14 व्या वर्षापासून तानाजी कलाबाज बनला. 

वांगीचे अब्दुल मुजावर यांच्याकडे प्रारंभी थोडे शिकणं झालं. हंगामात वाजंत्री म्हणून तर नंतर खुरडी, टोपली विणायची. बाजारात विकायची. हेच त्याचे जगण्याचे साधन. सध्या हा व्यवसाय मोडकळीस आलाय. प्रतिकूलतेशी संघर्ष करीत तो उमेदीने जगण्याची लढाई लढतोय. आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असं त्याचे कुटुंब आहे. 

तानाजीने आयपीएलची धून वाजवली ती जोतिबा यात्रेत ट्रंपेटच्या सहाय्याने. तरुणाईनं तब्बल तीन तास ठेका धरला. तानाजीची न्यारी लकबच सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली. 

तानाजी जसे वादक तसे चांगले गायक. "भक्तिसंगीत त्यांची आवड. त्यांच्या आवाजातील गोडवाही काही औरच आहे. 

ना (मान)धन 
स्पर्धा व पाश्‍चात्त्य संगीताच्या आक्रमणात कला, व्यवसाय लोप पावतोय. शासनाने अनेकांना मानधन दिले. पण तानाजी, वडील मारुती उत्तम कलाकार असूनही लाल फितीने मानधन नाकारले. ते मदतीपासून वंचित राहिलेत. 

पोलिस व्हायचंय... गणेश 
मामा पोलिस खात्यात फौजदार आहेत. तानाजीचं पोलिस होण्याचे स्वप्न होते. पण परिस्थितीमुळे शिकता आले नाही. पोलिस होण्याचं त्यांचं स्वप्न मुलगा गणेश पूर्ण करणार आहे. तो कष्ट करतोय. परिस्थितीशी दोन हात करत नवी उमेद घेऊन लढतोय. तो रडत नाही तर लढतोय. 

""बॅन्डऐवजी बॅंजोला मागणी वाढली. बॅन्डसाठी कलाकारही मिळत नाहीत. संगीतात रोज नव्याने बदल होत आहेत. बदलाला समोरे गेले तरच व्यवसाय टिकून राहील. अन्यथा पार मोडून जाईल. शासनाने कलेला ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न करावा. 
- तानाजी माने, रामापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT