download (4).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा इस्लामपूर  तीन दिवस लॉकडाऊन 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : निगडी (ता. शिराळा) आणि कऱ्हाड तालुक्‍यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात पुन्हा तीन दिवस पूर्ण 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या दोन्ही तालुक्‍यांचा इस्लामपूर शहराशी येणारा परस्परसंबंध विचारात घेऊन सोमवारी (ता. 27) ते बुधवारी (ता. 29) एप्रिल या काळात शहरातील पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक मुख्याधिकारी प्रमिला माने यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

शुक्रवारी (ता. 24) निगडी येथील एका युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ती व तिचे कुटुंबीय इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते, त्यानंतर त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवले होते. त्या रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाणार आहे. शिवाय दक्षता आणि खबरदारीचा भाग म्हणून तीन दिवस शहर पूर्ण लॉकडाऊन केले जाणार आहे. लोकांनी सणवार घरीच साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, "कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. शहरात सध्या रुग्ण आढळले नसले तरी आपण धोक्‍याच्या पातळीवर आहोत. नागरिकांनी याचे गांभीर्य समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. नागरिकांनी शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे." उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले, "लोकांनी अत्यावश्‍यक काम असल्याशिवाय आजिबात घराबाहेर पडू नये. किटवाटपसारख्या गोष्टी करताना त्यातून होणारा धोका लक्षात घ्यावा." मुख्याधिकारी पवार म्हणाल्या, "प्रशासनावर प्रचंड प्रमाणात ताण आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरूच आहेत; परंतु नागरिकांना द्यावयाच्या सुविधांनादेखील प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. 

या परिस्थितीत प्रशासनाला दिलासा मिळेल, यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. तीन दिवस लॉकडाऊनच्या काळात अजिबात कोणीही बाहेर पडू नये." पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले, "बाहेरून येणाऱ्या संसर्गाच्या सर्व शक्‍यता विचारात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून शहरात येणाऱ्यांनी विनाकारण येऊ नये आणि लोकांनीही घराबाहेर पडू नये. नियम व कायद्याचे उल्लंघन झाल्यास पोलीस कोणतीही गय करणार नाहीत. विनामास्क आढळल्यास कारवाई होणारच. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेला सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे." 

'ते' रुग्णालय सील! 
निगडी येथील कोरोनाबधित युवती इस्लामपुरात ज्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कुटुंबियांच्यासमवेत आली होती तेथील संपूर्ण माहिती घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाने ते रुग्णालय सील केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले. 

तिसऱ्यांदा लॉकडाऊन! 
शहरात कोरोनाबधित रुग्ण आढळले तेव्हा, रेठरेधरण येथील वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा अशा दोन्हीही वेळेला इस्लामपूर शहरात सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला होता. विशेषतः त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी निगडी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात लॉकडाऊनची ही तिसरी वेळ आहे. 

सर्वानुमते निर्णय! 
शहरात तीन दिवस लॉकडाऊन पाळण्याबाबतचा निर्णय हा सर्वानुमते असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस उपअधीक्षक उपस्थित नव्हते. निगडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शिराळा भागात आल्यामुळे प्रांत व तहसीलदार गैरहजर होते तर शिरसी (ता. शिराळा) येथील खुनाच्या घटनेमुळे पोलीस उपअधीक्षक उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या सर्वांशी चर्चा करूनच समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT