Islampur Constituency politics Jayant Patil vs Ajit Pawar
Islampur Constituency politics Jayant Patil vs Ajit Pawar esakal
पश्चिम महाराष्ट्र

Islampur Politics : अजितदादांच्या व्यासपीठावर 'शिळ्या कढीला ऊत'; आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य?

शांताराम पाटील

मतदारसंघात जयंत पाटील यांना शह देणे अशक्यप्राय आहे. त्यातच हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत कोणाच्या वाट्याला जाणार, याचेही चित्र स्पष्ट नाही.

इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटलांच्या (Jayant Patil) बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या इस्लामपूर येथील नवीन कार्यालयाचे उद्‍घाटन केले. जयंत पाटलांच्या पहिल्या फळीतील एकही कार्यकर्ता अद्याप तरी अजितदादांच्या गळाला लागलेला नाही. याउलट इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधकच त्यांच्या स्वागताला व व्यासपीठावर दिसले.

त्यामुळे जयंत पाटलांना शह देण्यासाठी अजितदादांना इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Constituency) मोठी मेहनत घ्यावी लागेल, अन्यथा या मतदारसंघात शिळ्या कढीला ऊत आणून आजवरच्या पाठीमागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या विरोधकांसारखी फजिती होणार आहे.

राज्याच्या राजकारणात ‘हेवीवेट’ नेते असलेले जयंत पाटील आगामी विधानसभा निवडणूक आठव्यांदा लढतील. ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याबरोबर जयंत पाटील नेहमी ‘बेरजेचे’ राजकारण करतात. प्रत्येक निवडणुकीनंतर मतदारसंघातील सर्वसामान्य विरोधकांसह मोठा विरोधक हाताला लागतोय का, याची बेरीज सुरू असते. यानच त्यांनी विलासराव शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) या बड्या नेत्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या विरोधकांना ‘आपलेसे’ केले व विधानसभेचा डाव नेहमीच आपल्या रणनीतीने खेळून विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

आजवर विलासराव शिंदे, रघुनाथदादा पाटील, वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, निशिकांत पाटील यांनी त्यांच्या विरोधात आपली ताकद आजमावली आहे. मात्र प्रत्येकवेळी विरोधकांत फूट पाडून अथवा त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून त्यांनी जयंतनीती दाखवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी अजितदादांचा गट शिंदे-भाजप सरकारला जाऊन मिळाला. अजितदादांनी राष्ट्रवादीतील बऱ्यापैकी ‘हेवीवेट’ नेते आपल्यासारखे करून सरकारमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटातून जयंत पाटील हे राज्य पातळीवर अजितदादांची डोकेदुखी ठरत आहेत.

अनेक वावड्या उठल्या, तरी ते विचलित न होता सरकारवर प्रहार करीत शरद पवारांच्या गटात ऊर्जा निर्माण करीत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा पहिल्यांदाच सोमवारी इस्लामपुरात आले. त्यांचे नातेवाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्‍घाटन केले. या कार्यक्रमात जयंत पाटील यांचे कोण मोहरे गळाला लागताहेत का, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र राहुल महाडिक व गौरव नायकवडी हे जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधक दादांच्या स्टेजवर स्वागताला दिसले.

राहुल महाडिक हे भाजपचे नेते आहेत, तर गौरव नायकवडी हे अद्याप तरी शिवसेनेत आहेत. त्यांनी प्रवेश न करता घटकपक्ष म्हणून दादांच्या स्वागताला उपस्थिती लावली. त्यातच निशिकांत पाटील यांचे कार्यकर्तेही दादांच्या स्वागताला घटक पक्ष म्हणूनच उपस्थित होते. अजितदादांच्या गटामध्ये नव्याने निवडी झालेले तालुक्यातील पदाधिकारी पाहिले, तर त्यांना जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत संधी न मिळाल्याने व फारसे चर्चेत नसलेले चेहरेच पाहायला मिळाले. सध्या तरी पारंपरिक विरोधकांच्या मदतीने व नव्याने निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने अजितदादांच्या गटाची वाटचाल राहील.

अजितदादांनाच लक्ष घालावे लागेल

या मतदारसंघात जयंत पाटील यांना शह देणे अशक्यप्राय आहे. त्यातच हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत कोणाच्या वाट्याला जाणार, याचेही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे अजितदादांच्या गटात जाऊन जयंत पाटलांचा विरोध पत्करण्याच्या पवित्र्यात सध्या तरी पूर्वीच्या एकसंध राष्ट्रवादीतील कोणताही नेता नाही. एकूणच, अजितदादांना तुल्यबळ गट निर्माण करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता अजितदादांना स्वतः लक्ष घालून मेहनत करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT