Islampur Municipal Meeting Confusion Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर नगरपालिकेत जोरदार खडाजंगी....

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : लोकनेते राजारामबापू पाटील नगरव्याख्यानमालेच्या खर्चावरून आज नगरपालिकेच्या सभेत दोन्ही गटात गोंधळ झाला. सहा लाख 35 हजार रुपये खर्च झाला असताना सभेत एक लाख 35 हजार रुपयांची टिपणी सादर केल्याने विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार यांनी त्याला आक्षेप घेतला. उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली.

 शहरात अन्य काही महनीय व्यक्ती होऊन गेल्या असताना त्यांच्या बरोबरीने काम केलेल्या बापूंनाच महत्त्व दिले, आमचा त्याला आक्षेप नाही; परंतु तरीही खोटे आकडे दाखवून नेमके काय साध्य करायचा प्रयत्न सुरू आहे? असा सवाल वैभव पवार यांनी उपस्थित केला.

पालिकेला भुर्दंड कशाला?

दरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या लोकांनी हा खर्च स्वतः करावा, पालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना पालिकेला भुर्दंड कशाला? असाही टोमणा मारला. राष्ट्रवादीने व्याख्यानमालेच्या खर्चाच्या विषयाला बगल देत पवार यांनी घेतलेल्या आक्षेपाला तोंड दिले. खंडेराव जाधव आणि शहाजी पाटील यांनी या भाषेला आक्षेप घेतला. पवार यांनीही त्याला आक्रमक शैलीत प्रत्त्युत्तर दिले. कुणाला, कोणत्या कामासाठी किती पैसे दिले याचे सर्व तपशील मिळाले पाहिजेत, अशी मागणी पवार आणि अमित ओसवाल यांनी केली.

कोणताही भ्रष्टाचार नाही
लोकनेते राजारामबापूंच्या नावाने असलेल्या व्याख्यानमालेच्या विषयाला गालबोट लागू नये, असे मत शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव यांनी मांडले. दरम्यान या खर्चात कोणताही घोळ झाला नसून दरवर्षी जो खर्च होतो, त्याच प्रमाणात यंदाही खर्च केला आहे. यात भ्रष्टाचार करण्याइतकी आमची पातळी खालावलेली नाही, अशा भाषेत मुख्याधिकारी प्रज्ञा पवार-पोतदार यांनी वैभव पवार यांना प्रत्त्युत्तर दिले. 

देशभरातील लोकांचा समावेश

अपूर्व गोंधळानंतर 'या खर्चाचे सर्व तपशील मी स्वतः लक्ष घालून पुढच्या बैठकीत सादर करते' असे आश्वासन मुख्याधिकारी पवार यांनी देताच हा विषय तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे वडील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पालिकेकडून गेली आठ वर्षे नगरव्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. देश व राज्यातील नामवंत आणि दिग्गज लोक यात सहभागी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT