Islampur Municipality meeting
Islampur Municipality meeting Sakal
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर पालिकेची सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी रद्द

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : शहराचे ईश्वरपूर (Ishwarpur) नामकरण करण्याबरोबरच अन्य तीस विषयांच्या मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली आजची सर्वसाधारण सभाही (Islampur Municipality meeting) गणपूर्तीअभावी रद्द करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. शिवाय धक्कादायकरित्या विकास आघाडीच्याही तीन नगरसेवकानी सभेकडे पाठ फिरवली. ईश्वरपूर नामकरणसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली, तर वैभव पवार यांनी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष तैलचित्र अनावरणला राष्ट्रवादीचेच नगरसेवक गैरहजर असल्याची दुर्देवी भावना व्यक्त केली. (Sangaliislampur municipality News )

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वरपूर नामकरण विषवर आज चर्चा होणार होती, त्यामुळे या सभेला राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती. संपूर्ण शहराचे त्याकडे लक्ष लागले होते; मात्र शिवसेनेचे चार व नगराध्यक्षांसह विकास आघाडीचे ४ असे एकूण आठ जणच या सभेला उपस्थित होते.

गणपूर्तीसाठी ९ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्या पूर्तीअभावी आजची सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली. आनंदराव पवार यांनी गैरहजर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कळकळीची विनंती केली, ईश्वरपूर नामकरण करणे हा माझा एकट्याचा विषय नाही. माझा कोणत्याही जातीधर्माला विरोध नाही. ईश्वर सर्वांचा असतो. अल्ला हादेखील ईश्वर आहे. त्या नात्याने आम्ही ईश्वरपूरसाठी आग्रही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वाळव्यासह २३ गावांना येऊन गेल्याचा ३६१ वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

त्यावेळच्या नोंदींमध्ये उरण असाच उल्लेख आहे. ज्या परकी हल्लेखोरांनी येथे तळ ठोकला, त्यांनी इस्लामपूर असे नाव दिल्याचे संदर्भ आहेत, असे असताना नाव बदलण्यासाठी विरोध कशासाठी? राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात उपस्थित राहून आपली विरोधाची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन पवार यांनी केले. विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी खंत व्यक्त करीत ज्या विजयभाऊ यांनी शहरावर ३१ वर्षे राज्य केले त्यांच्या तैलचित्र अनावरणाला राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित राहावे, हे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. विकास आघाडीच्या मंगल शिंगण, अन्नपूर्णा फल्ले यांच्यासह शिवसेनेच्या सीमा पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार सभेला उपस्थित होते.

पक्षप्रतोद पाटील यांची दांडी!

ईश्वरपूर नामकरण करण्याला विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांचाही विरोध असल्याचे आज स्पष्ट झाले. आजच्या सभेला ते व त्यांच्या नगरसेविका भावजय सुप्रिया पाटील यादेखील या सभेला गैरहजर राहिल्या. विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असे अनुपस्थित राहिल्याबद्दल आनंदराव पवार यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. आघाडीसोबत काम कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादीची फूस असल्याने त्यांचे राष्ट्रवादीशी संगनमत करून काही सुरू आहे का हे पहावे, असेही त्यांनी सुचवले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पाचव्यांदा दांडी!

शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या ११ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी ज्या विशेष सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्या तीनही सभांना राष्ट्रवादी काँग्रेसने गैरहजेरी लावून या सभा रद्द करण्यास भाग पाडले होते. दरम्यान शिवसेनेने इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करण्याचा केलेला प्रयत्नही राष्ट्रवादीने हाणून पाडला आहे या पाचही सभांना राष्ट्रवादीने दांडी मारली.

त्याबाबतची खंत आनंदराव पवार यांनी बोलून दाखवली या सर्व नगरसेवकांच्या वैयक्तिक भेटी घेऊन पवार यांनी त्यांना सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली होती; तरीही राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष केले. याच मुद्द्यावर पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांच्या भेटी घेणार असून मुदत संपण्यापूर्वी उर्वरित सात दिवसांच्या कालावधीत सभा आयोजित करण्याची विनंती पवार यांनी नगराध्यक्षांना केली. यावर कायदेशीर बाबी तपासून सभा घेण्याचे आश्वासन नगराध्यक्ष पाटील यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT