विजयनगर (ता. माण) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संगणकाद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी.
विजयनगर (ता. माण) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संगणकाद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी. 
पश्चिम महाराष्ट्र

आयटी@प्राथमिक शाळा

विशाल पाटील

सातारा - पाटीवरती रेगुट्या मारणे, त्यामधून अ आ ई शिकणे यापलीकडे आता प्राथमिक शाळांची धाव पोचली आहे. पाटीवरची बोटे आता स्क्रीनवर फिरू लागली आहेत, तर अ आ ई चा आवाज आता साउंडमधून येऊ लागला आहे. कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुले आता मागे न राहता इंटरनेट साक्षर बनत आहेत. तब्बल एक हजार ८९८ प्राथमिक शाळा ‘माहिती तंत्रज्ञान’ पूर्ण (आयटी) बनल्या आहेत. 

साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख ही संकल्पना केव्हाच मागे पडली आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात साक्षर असलेलेही मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करता येत नसेल, तर या जगात मागे पडत जातात. मोबाईल किंवा इंटरनेटविषयी ज्ञान नसणे म्हणजे ‘गावंढळ’पणा मानले जात आहे. आता तर सरकार सारे काही संकेतस्थळ, मोबाइल ॲपच्या माध्यमातून करू पाहात आहे. त्याशिवाय ऑनलाइन सेवा या केव्हाच सुरू झाल्या आहेत. मोबाईल आणि इंटरनेट साक्षर असणे काळाची गरज बनली आहे. मोबाईल, इंटरनेट ही संवाद आणि संपर्काची माध्यमेच उरली नसून, ती ज्ञानाची शिदोरी ठरली आहे. 

लहान मुले गेम खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी मोबाइल, लॅपटॉप, संगणकाचा वापर करतात, हे असे म्हणणे शंभर टक्‍के खरे ठरू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७०३ शाळांपैकी तब्बल एक हजार ८९८ शाळा डिजिटल बनल्या आहेत. या शाळांत संगणक, लॅपटॉप, टॅब, प्रोजेक्‍टर, मोबाइलद्वारे शिक्षण दिले जाते. बहुतांश शिक्षक तंत्रस्नेही बनले असून, ते या साधनांद्वारे विद्यार्थ्यांना धडे शिकवत आहेत. विद्यार्थीही मोबाइल ॲप, यू-ट्यूबद्वारे अधिक माहिती घेत असतात. शिवाय पुस्तकांवर असलेली क्‍यूआर कोड स्कॅन करून संदर्भ माहिती घेतात. अनेक विद्यार्थी तर स्वत:च व्हिडिओ तयार करून यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करतात. ‘वन टच, वर्ल्ड टच’प्रमाणे स्मार्ट डिव्हाइसवर एका स्पर्शाद्वारे जगाला स्पर्श करणारे हे विद्यार्थी उज्ज्वल भविष्याकडे पुढे जात आहेत.

या आहेत अडचणी
तंत्रज्ञानाच्या युगात केरळ राज्य हे आपल्यापुढे केव्हाच पोचले आहे. २००३ पासून तेथे प्राथमिक, माध्यमिक शालेय जीवनात माहिती तंत्रज्ञान विषय शिकविला जात आहे. आपण, अद्यापही त्यांच्या मागेच आहेत. सध्या डिजिटल शाळांची संख्या वाढत असली तरी अद्यापही काही भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीची समस्या, व्यावसायिक वीजबिल आकारणी, डिजिटल उपकरणांचा अभाव, शिक्षकांतील अज्ञान या अडचणी आ-वासून आहेतच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT