It was difficult to get the ripe yam out of the field 
पश्चिम महाराष्ट्र

पिकविलेली रताळी शेतातून बाहेर काढणे झाले मुश्‍किल

रविंद्र मोहिते

वांगी : पिकाच्या काढणीचे व विक्रीचे अचूक नियोजन करीत पिकविलेली रताळी वेळेत शेतातून उकरुन बाहेर काढणे मुश्‍किल झाल्याने वांगीतील तीन युवा शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

नवरात्रीनिमित्त उपवासासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या रताळी पिकाची वेळेत लागण करुन तसेच खते, औषधाची व मशागतीची कामे बिनचूक करीत वांगीतील युवाशेतकरी रमेश एडके व पवन जाधव यांनी प्रत्येकी एक एकर आणि सागर चव्हाण यानी अर्धा एकर रताळी पिकविली आहेत. नवरात्रीचा उपवास सुरु झाला की ती विकायची यानुसार ती अचूक वेळेत काढणीलाही आली. व्यापाऱ्याबरोबर 25 रुपये प्रतिकिलो प्रमाणे दरही ठरला. मागील आठवड्यात या पिकाचा जमिनीवरील पाला काढला. 

दोन दिवसात रताळी काढून पाठवायची तोवर मागील आठवड्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला तिघांचीही रताळी शेती पाण्याने गच्च भरली. दोन दिवसात वाफसा आला की काढू या आशेवर त्यांनी मनाला समजावले. परंतू काल (सोमवारी ) दुपारी अचानकपणे पावसाने झोडपले. या शेतातून पुनश्‍चः पाणी वाहू लागले आणि या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. शेतात आत जाणेही शक्‍य नाही. रताळीसाठी एकरी 70 हजार खर्च केलेत. त्यात मशागत व मजूरी घरचीच आहे. यामधून एकरी किमान 15 टन उत्पन्न मिळाले असते. मात्र त्यावर पावसाने पाणी फिरविले आहे. तर शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT