पश्चिम महाराष्ट्र

पुरेशा बसअभावी विद्यार्थ्यांवर लोंबकळत जाण्याची वेळ

निपाणी परिसरातील चित्र; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

विकास पाटील

निपाणी : कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या येथील आगारातून लांब पल्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी बससेवा सुरु झाल्या आहेत. मात्र पुरेशा बसअभावी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. महामार्गावरूनही अनेक विद्यार्थी बसमधून लोंबकळत बसप्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून विविध शाळा, महाविद्यालयांचा आनॅलाईन अभ्यासक्रम व परीक्षाही आॅनलाईनच झाल्या आहेत.

त्यामुळे यंदा विविध परीक्षा व महाविद्यालयातून उतीर्ण होणारया विद्यार्थ्यांची संख्या चौपट झाली आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी उतीर्ण झाल्यामुळे अनेक हायस्कूल, महाविद्यालयांना जादा वर्ग सुरु करावे लागले आहेत. त्यामुळे शिक्षकांची कसरत सुरु झाली आहे. निपाणी आगारातून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसप्रवास करता येऊन सुलभ शिक्षण घेण्यासाठी बसपासची योजना राबविली आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला आहे. बससेवा सुरळीत सुरु असली तरी विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यंदा विद्यार्थी संख्या चौपट

कोरोनामुळे आॅनलाईन शिक्षणासह परीक्षाही आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यंदा उतीर्ण होणारया विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षापेक्षा चौपट झाल्यामुळे बसमध्ये विद्यार्थ्यांना जागा मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर काही विद्यार्थिनींना दुसरया बसच्या प्रतिक्षेत थांबावे लागत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात वेळेत पोहचणे कठीण झाले आहे.

`यंदा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. त्यांना बसमध्ये जागा मिळत नसल्याने पर्यायी दुसरया बसच्या प्रतिक्षेत थांबावे लागत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात वेळेत पोहचता येणे अशक्य झाले आहे.`

-शरद पाटील,

पालक, यमगर्णी

`शाळा, महाविद्यालये सुरु होताच ग्रामीण भागातील सर्वच मार्गावर बससेवा सुरु केल्या आहेत. मात्र यंदा विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे एकाच बसमधून सर्व विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात पोहचू शकत नाहीत. त्यांना पर्यायी दुसरया बसने प्रवास करणे भाग पडत आहे.`

-मंजुनाथ हडपद,

आगार व्यवस्थापक, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT