रोमित चव्हाण Sakal
पश्चिम महाराष्ट्र

जम्मू काश्मीर: देशसेवा बजावताना सांगली जिल्ह्यातील रोमित चव्हाणांना वीरमरण

जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला.

सकाळ वृत्तसेवा

बागणी : शिगाव (ता. वाळवा) गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण (वय २३) यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र १ राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे रेजिमेंटल सेंटर वर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. (Army Soldier Death)

चार महार येथून त्यांच्या सेवेला सुरवात झाली होती. एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले. रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील सह साखर कारखाना येथे कार्यरत आहेत.

आई गृहिणी आहे तर बहीण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी पार्थिव पोहचल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT