crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे...जतमध्ये सराफाचे सव्वा दोन कोटीचे सोने लंपास...चौघा लुटारूंकडून मिरचीपूड टाकून सराफ व साथीदारास मारहाण 

बादल सर्जे

जत (सांगली) - शेगाव (ता. जत) येथे सोन्याची डिलिव्हरी देण्यास जात असताना अज्ञात चार चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून, त्यांना मारहाण करत गाडीतील चार किलो 600 ग्रॅम सोने चोरून पळ काढला. मध्यरात्रीनंतर शुक्रवारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. या सोन्याची बाजार भावानूसार किंमत दोन कोटी 26 लाख 13 हजार 500 रूपये इतकी किंमत होते. याबाबत बाळासाहेब वसंत सावंत (रा. पळसखेल, ता. आटपाडी) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळासाहेब सावंत व अन्य एक सहकारी हे गुरूवारी मध्यरात्री बेळगावहून चारचाकी गाडीतून सोन्याची डिलिव्हरी देण्यास जत तालुक्‍यातील शेगावकडे निघाले होते. काही संशयित मोटारीतून त्यांच्या पाठलागावर होते. जत पासून पाच किलो मिटर अंतरावर असलेल्या माळी वस्तीजवळ लघुशंकेसाठी दोघेजण मोटारीतून उतरले. त्याचवेळी चार लुटारूंनी मोटारीतून त्यांना गाठले.

चौघांनी अंधारात त्यांच्याकडील मिरची पूड बाहेर काढून श्री. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीनंतर मोटारीत ठेवलेले चार किलो 600 ग्रॅम सोने घेऊन चोरट्यांनी अंधारात पळ काढला. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या सावंत आणि सहकाऱ्यांनी जत पोलिस ठाणे गाठले. तेथे जबरी चोरीची फिर्याद दिली. लुटमारीची माहिती मिळताच सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तत्काळ रवाना झाले. जत पोलिस तसेच जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले हे तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT