Jat Taluka Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Energy Drink : जतमध्ये एनर्जी ड्रिंकमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू?

वृषव हा तिकोंडी येथील बसवेश्वर हायस्कूल येथे नववी वर्गामध्ये शिकत होता.

राजू पुजारी

अवघ्या २० रुपयांमध्ये हे शीतपेय उपलब्ध होत असल्याने मुलं एनर्जी ड्रिंक पितात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

जत तालुक्यातील तिकोंडी येथील शाळकरी मुलाचा एनर्जी ड्रिंक प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा दावा मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. वृषव अशोक राचगोंड (वय १६) असं मृत मुलाचं नाव असून या वृत्ताबाबत अद्याप डॉक्टरांकडून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

वृषवला एनर्जी ड्रिंक प्यायची लागली सवय

वृषव हा तिकोंडी येथील बसवेश्वर हायस्कूल येथे नववी वर्गामध्ये शिकत होता. सध्या नववीची परीक्षा सुरू असून वृषवने काही पेपर दिले होते. वृषवला एनर्जी ड्रिंक प्यायची सवय लागली होती. शनिवारी त्याने लागोपाठ तीन बॉटल एनर्जी ड्रिंकचे प्राशन केले. काही वेळाने त्यास बसल्या ठिकाणी चक्कर आली व जमिनीवर पडला. नातेवाईकांना समजल्यानंतर ते वृषवला घेऊन उपचारासाठी जत येथे जात होते. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

अवघ्या 20 रुपयांत शीतपेय उपलब्ध

जत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. रिपोर्ट पुढील कारवाई तसंच वैद्यकीय तपासासाठी पाठवण्यात आल्याचे नातवाईकांनी म्हटलं आहे. एनर्जी ड्रिंकमुळंच वृषवचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला तोंडी सांगितलं आहे, असं नातेवाईकांनी म्हटलंय. वृषवचा मृत्यू एनर्जी ड्रिंकमुळंच झाल्याची चर्चा गावात सुरू असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी ड्रिंकचे पिण्याचे प्रमाण वाढतेय. अवघ्या २० रुपयांमध्ये हे शीतपेय उपलब्ध होत असल्याने मुलं एनर्जी ड्रिंक पितात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

आई अंगणवाडी सेविका

वृषवची आई अंगणवाडी सेविका असून शनिवारी त्या कार्यालयीन बैठकीसाठी गेल्या होत्या. तर वडील कारखान्यात काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT