Jawan Tejas More esakal
पश्चिम महाराष्ट्र

Indian Army : कर्तव्य बजावताना भारतीय जवानाचा मृत्यू; बिऊर गावात तेजस मोरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तेजस यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळ डिजिटल टीम

तेजस राजस्थानमधील लालगड येथे टेन्मेंट इन्फंट्री युनिटमध्ये मॅकनाईज विभागात शिपाई पदावर कार्यरत होते.

पुनवत : सैन्यदलात कार्यरत शिराळा तालुक्यातील बिऊर-विश्रामबाग येथील तेजस युवराज मोरे (वय २४) हे कर्तव्य बजावत असताना अचानक चक्कर येऊन पडले. नंतर त्यांना (Jawan Tejas More) तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी (ता. १४) उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काल सकाळी दहाच्या सुमारास शासकीय इतमामात सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पार्थिवास वडील युवराज मोरे, भाऊ तुषार मोरे यांनी भडाग्नी दिला. बिऊर गाव व परिसरात शोककळा पसरली होती. आज त्याचा पार्थिव घरी आणल्यानंतर आई अनिता, वडील युवराज व भाऊ तुषार यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. तेजस यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झाले नसून व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पार्थिवासमवेत आलेल्या जवानांनी दिली.

वडील युवराज यांनी दोन्हीही मुलांना सैन्यात भरती करायच्या जिद्दीने काबाडकष्ट करून शिकवले. परिस्थितीची जाणीव ठेवून तुषार व तेजस हे भाऊ एकाच दिवशी, २० जून २०१८ रोजी सैन्यदलात भरती झाले. तेजस राजस्थानमधील लालगड येथे टेन्मेंट इन्फंट्री युनिटमध्ये मॅकनाईज विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. तेजस यांना कर्तव्य बजावतानाच रविवारी अचानक चक्कर आली. अन्य जवानांनी त्याला तातडीने सेना रुग्णालयात नेले. तेथून गंगानागर येथील सेना रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने तातडीने हेलिकॉप्टरने चंदीगड (Chandigarh) येथील सेना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेजस यांचे भाऊ तुषार मोरे हे हिमाचल प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. ते सुटीवर बिऊर येथे आले आहेत. तेजस यांचे पार्थिव अमोल मोरे, आकाश बामनळे हे जवान गावी घेऊन आले. नायब तहसीलदार हसन मुलाणी, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी पार्थिवावार पुष्पचक्र अर्पण केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, मंडल अधिकारी सविता पाटील, जिल्हा सहकार बोर्डचे माजी अध्यक्ष सुखदेव पाटील, ‘विश्वास’चे संचालक दिनकरराव पाटील, तलाठी राहुल काळे, पोलिस पाटील सीताराम पाटील, सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच श्रीरंग पाटील, कोतवाल उत्तम पाटील आदींसह माजी सैनिक व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते. तेजसच्या मागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT