जयंत पाटील sakal
पश्चिम महाराष्ट्र

नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जयंत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल हे ट्विट केले.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल हे ट्विट केले. सांगली या जिल्ह्याच्या शहरापासून जयंत पाटील यांचे होम ग्राऊंड असलेल्या इस्लामपूरला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयणिय अवस्था आहे. त्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला होताच, शिवाय जयंत पाटील यांनी ‘सेल्फी वुईथ खड्डे’ काढलेला फोटो शेअर करत आता राज्यात तुमची सत्ता आहे, खड्डे मुजवा, अशी आठवण करून दिली होती.

जयंत पाटील यांच्या मतदार संघातून सांगलीला जोडणारा पेठ-सांगली रस्ता खूप वर्षे प्रलंबित आहे. हा आता पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा उपमार्ग ठरणार आहे. त्यामुळे तो केंद्राकडे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. त्याचे काम रखडलेले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये त्याचीही आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे, की ‘पेठ-सांगली’ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने तो केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. तरीदेखील राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना सदर रस्त्यावर असलेले खड्डे मुरमाने भरून घेण्याची सूचना दिली आहे. त्याकरीता मुरुमदेखील उपलब्ध करून दिला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT